'गहराइयां' फेम अनन्या पांडेने केला रिलेशनशीपबाबतचा खुलासा, दिली चाहत्यांना हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:53 IST2022-03-03T15:53:09+5:302022-03-03T15:53:36+5:30
अनन्या पांडे (Ananya Panday)चा नुकताच 'गहराइयां' (Gehraiyaan) हा चित्रपट रिलीज झाला.

'गहराइयां' फेम अनन्या पांडेने केला रिलेशनशीपबाबतचा खुलासा, दिली चाहत्यांना हिंट
अनन्या पांडे(Ananya Panday)चा नुकताच 'गहराइयां' (Gehraiyaan Movie) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. या चित्रपटातील अनन्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. अनन्या पांडे ईशान खट्टरला डेट करत असल्याची चर्चा आहे. बऱ्याचदा दोघे एकत्र स्पॉट होतात. दोघेही लंच-डिनर आणि हॉलिडे एकत्र एन्जॉय करताना दिसले आहेत. ईशाननेही अनन्याला त्याच्या शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केले होते. अनन्याने तिच्या रिलेशनशीपबद्दल स्पष्ट केले नसली तरी हिंट दिली आहे.
बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार, जेव्हा एका चाहत्याने अनन्या पांडेला विचारले की ती सिंगल आहे का, तेव्हा अभिनेत्रीने सुरुवातीला प्रतिक्रिया दिली की तिने काहीही ऐकले नाही, परंतु नंतर सांगितले की ती खूप आनंदी आहे. जेव्हा दुसऱ्या एका चाहत्याने विचारले की तिचा आवडता सहकलाकार कोण आहे, तेव्हा अभिनेत्रीने क्षणाचाही विलंब न लावता ईशान खट्टरचे नाव घेतले. याशिवाय तिने असेही सांगितले की तिचे सर्व मेल सहकलाकार अप्रतिम आहेत. ती पुन्हा एकदा 'खो गये हम कहाँ' मध्ये सिद्धांत चतुर्वेदीसोबत काम करत आहे.
नुकतीच शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत अनन्या पांडे दिसली होती. शाहिदने नंतर त्याच्या वाढदिवसाच्या रीलमध्ये अनन्या आणि शाहिदचा एक फोटो शेअर केला. या दोघांना एकत्र पार्टी करताना पाहून चाहते खूश झाले. अनन्या पांडेने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी आणि ईशानने 'गहराइयां' चित्रपट एकत्र पाहिला होता. मला वाटते की तो पुन्हा अॅमेझॉनवर पाहत आहे. सिनेमा आणि अभिनयाच्या बाबतीत त्याचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्याचे व्यक्तिमत्त्वही खूप गोड, प्रेमळ आणि आश्वासक आहे. माझ्या अवतीभवती खूप प्रेम आहे, म्हणून मी खूप आभारी आहे.
अनन्या पांडे आणि ईशान खट्टरने 'खाली-पीली' चित्रपटात एकत्र काम केले होते. २०२० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट काही खास दाखवू शकला नाही पण अनन्या आणि ईशानची जोडी मात्र चांगलीच पसंतीस उतरली होती.