सिनेमातील इंटिमेट सीन्स कसे शूट होता? वाचून व्हाल अवाक्...; ‘गहराइयां’ने सुरु केला नवा ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 08:00 AM2022-02-05T08:00:00+5:302022-02-05T08:00:02+5:30
Gehraiyaan : ‘गहराइयां’ या चित्रपटातील बोल्ड इंटिमेट सीन्स सीनमुळे आणि क्रेडिट प्लेटमुळे वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. होय, याक्रेडिट प्लेटवर इंटिमसी डायरेक्टरचं नाव आहे.
‘गहराइयां’ (Gehraiyaan ) हा दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडेचा सिनेमा येत्या 11 तारखेला ओटीटीवर प्रदर्शित होतोय. चित्रपटाची आधीच जोरदार चर्चा होती. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या चित्रपटाची एका वेगळ्याच कारणानं चर्चा सुरू झाली. होय, ट्रेलरमधील दीपिकाचे बोल्ड इंटिमेट सीन्स पाहून चाहते हैराण झालेत. ट्रेलरने चाहत्यांचं लक्ष वेधलं तसंच या ट्रेलरच्या शेवटी येणाऱ्या क्रेडिट प्लेटनंही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. होय, क्रेडिट प्लेटवर इंटिमसी डायरेक्टरचं नाव होतं.
हे इंटिमसी डायरेक्टर (Intimacy Director)काय प्रकरण आहे? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आता लेखक असीम छाबरा यांनी यासंदर्भात एक टिष्ट्वट केलं आहे. असीम यांनी चित्रपटाची क्रेडिट प्लेट शेअर करत एक ट्विट केलं आहे.
‘मी कदाचित चुकीचा असू शकेन. पण भारतीय सिनेमात याआधी कधी इंटिमसी डायरेक्टरला क्रेडिट देताना पाहिलं आहे का? मी दार गाईला (Dar Gai) ओळखतो आणि या सिनेमातील (गहराइयां) तिचं काम पाहायला मी उत्सुक आहे,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.
I could be wrong, but is it the first time I have seen a credit for an “Intimacy Director” in an Indian film (or any other film)? I know Dar Gai and am really curious about her contribution to this film. pic.twitter.com/eTCZ12hZly
— Aseem Chhabra (@chhabs) January 5, 2022
आता ही दार गाई कोण? इंटिमसीचा आणि तिचा काय संबंध, ते जाणून घेऊ यात. तर अनेक चित्रपटात इंटिमेट सीन्स असतात. अनेकदा न्यूड सीन्स असतात, किसींग सीन्स असतात आणि हे सगळे सीन्स शूट करणं ही इंटिमसी डायरेक्टरची जबाबदारी असते. होय, पण त्याचं काम फक्त इतकंच नाही. त्याशिवायही ते बरंच काही करतात. एखादा इंटिमेट वा हॉट सीन शूट होत असेल तर, त्या सीनमध्ये अॅक्टर्स एकमेकांना फिजिकली कसा स्पर्श करतील इथपासून तर हे अॅक्टर्स कोणते कपडे परिधान करतील, इथपर्यंतच्या अनेक गोष्टी इंटिमसी डायरेक्टरला कराव्या लागतात. एखादा कलाकार असे सीन्स देताना कम्फर्टेबल नसेल तर त्याला कम्फर्टेबल करणं, हेही त्याचं मुख्य काम असतं. कारण इंटिमसी डायरेक्टर केवळ तांत्रिक काम करत नाही तर तो मानसिक अंगानेही तो काम करतो. एखादा कलाकार असे सीन करताना उत्तेजित होत असेल तर त्याला जज करणं, त्याला सांभाळणं, विशेषत: अभिनेत्रीसोबत वाईट काही घडणार नाही, याची काळजी घेणं, अशी अनेक कामं इंटिमसी डायरेक्टरला करावी लागतात.
मी टू या मोहिमेनंतर इंटिमसी डायरेक्टरची कॉन्सेप्ट अधिक प्रचलित झाला आहे. मीटू मोहिमेदरम्यान बड्या बड्या निर्माता-दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचे, गैरवर्तनाचे आरोप झालेत. हॉलिवूडमध्येही यामुळे खळबळ माजली होती. यानंतर एचबीओ या स्टुडिओने पहिल्यांदा इंटिमसी को-ऑर्डिनेटर वा कोरिओग्राफर हायर केला होता. 2019 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज ‘सेक्स एज्युकेशन’ या सीरिजसाठीही इंटिमसी को-ऑर्डिनेटर हायर केला गेला होता. आता भारतात ‘गहराइयां’ या सिनेमाद्वारे इंटिमसी डायरेक्टर हायर करण्याची प्रथा सुरू झाली म्हणायला हरकत नाही.
दार गाई कोण आहे?
दार गाई ही गहराइयां या सिनेमाची इंटिमसी डायरेक्टर आहे. तिचं पूर्ण नाव Daria Gaikalova असं आहे. पण कुणीही आपल्या जेंडर वा नॅशनॅलिटीबद्दल बोलू नये, यासाठी ती दार गाई हे नाव लावतं. युक्रेनची दार गाई गेल्या 10 वर्षांपासून भारतात राहतेय. ती लहानपणापासून अॅक्टिंग व डायरेक्शनशी जुळलेली आहे. ती एका चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी भारतात आली आणि इथलीच झाली. 2017 मध्ये तिने तीन और आधा हा सिनेमा दिग्दर्शित केला. आता तीच गहराइयांची इंटिमसी डायरेक्टर आहे.