Gehraiyaan Movie Review: कॉम्प्लिकेटेड नात्यांची 'गहराइयां', वाचा कसा आहे दीपिकाचा सिनेमा?

By तेजल गावडे | Published: February 11, 2022 12:04 PM2022-02-11T12:04:08+5:302022-02-11T12:04:52+5:30

Gehraiyaan Review: दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचा बहुचर्चित चित्रपट गहराइयां नुकताच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती.

Gehraiyaan Movie Review: Read 'Deepness' of Complicated Relationships, How is Deepika's Cinema? | Gehraiyaan Movie Review: कॉम्प्लिकेटेड नात्यांची 'गहराइयां', वाचा कसा आहे दीपिकाचा सिनेमा?

Gehraiyaan Movie Review: कॉम्प्लिकेटेड नात्यांची 'गहराइयां', वाचा कसा आहे दीपिकाचा सिनेमा?

googlenewsNext

कलाकार - दीपिका पादुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवा
दिग्दर्शक - शकुन बत्रा
कालावधी - २ तास २८ मिनिटं
स्टार - तीन स्टार (***)

दीपिका पादुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा बहुचर्चित चित्रपट 'गहराइयां' (Gehraiyaan Movie) नुकताच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली होती. या चित्रपटात दीपिका पादुकोण (Deepika Padukone)ने सिद्धांत चतुर्वेदी(Siddhant Chaturvedi)सोबत दिलेल्या बोल्ड इंटिमेट सीन्समुळे या चित्रपटाची रिलीजच्या आधीच खूप चर्चा झाली होती.  हा चित्रपट नात्यातील गुंतागुंतीवर आधारीत आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं तर, मुंबईतील आपल्या जीवनात आणि करिअरमध्ये नाखुश असलेली अलिशा  (Deepika Padukone) ८ वर्षांपासून करण (Dhairya Karwa) सोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असते. अलिशाच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष पाहायला मिळतो. ते दोघे भाड्याच्या घरात राहत असतात. पैसे नाहीत पण बऱ्याच महत्त्वकांक्षा आहेत. अलिशाची चुलत बहिण तान्या (Ananya Panday) आणि तिचा फियॉन्से जेन (Siddhant Chaturvedi) परदेशातून मुंबईत येतात. दोघेपण श्रीमंत आहेत. जेन रिअल इस्टेट बिझनेसमध्ये असतो आणि अलिबागमधील एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असतो.  हे चौघे अलिबागला जातात. तिथे फ्लर्ट करता करता अलिशा आणि जेन यांच्यात जवळीक वाढते. अलिशा आणि जेन एकमेकांच्या प्रेमात पडतात. इतकेच नाही तर अलिशा जेनपासून प्रेग्नेंट राहते. या दोघांच्या नात्याबद्दल तान्याला माहित नसते. तसेच अलिशा आणि करणदेखील वेगळे होतात. तर दुसरीकडे जेनचा प्रोजेक्ट अडचणीत सापडतो. कोणत्याही क्षणी सर्व ठप्प होईल, अशी परिस्थिती निर्माण होते. अशावेळी स्वतःचा बिझनेस वाचवण्यासाठी जेनला तान्याच्या मदतीची गरज असते. त्यामुळे तो तिला आणि अलिशा या दोघींनाही त्याचे त्यांच्यावरील प्रेम खरे आहे, हे सांगतो.  दरम्यान, चित्रपटात जेनचा मृत्यू होतो. आता त्याचा मृत्यू कसा होता, की त्याचा कोणी मर्डर करतो? शेवटी कोण कोणासोबत रिलेशनशीपमध्ये राहतात, या सर्व प्रश्नांची उत्तर चित्रपटात मिळतील.

चित्रपटाच्या कथेत अजिबात नाविन्य नाही. त्रिकोणी प्रेमकथेवर आधारीत आपण बरेच चित्रपट पाहिले आहेत. मात्र हा चित्रपट वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला असला तरी यात तो पूर्णपणे यशस्वी ठरू शकला नाही. पूर्वाध खूपच धीम्या गतीने पुढे सरकतो. त्यामुळे थोडा कंटाळवाणा वाटतो. दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचे चित्रपटात बरेच बोल्ड सीन्स दाखवले आहेत. मात्र त्याची कथेत फारशी गरज नसल्याचेही जाणवते.  दिग्दर्शनाबद्दल सांगायचं तर 'एक मैं और एक तू' आणि 'कपूर अँड सन्स' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक शकुन बत्राच्या दिग्दर्शनात फारसे नाविन्य दिसले नाही. चित्रपटाचे बॅकग्राउंड म्युझिक आणि सिनेमॅटोग्राफी ही या चित्रपटाच्या जमेची बाजू आहे.

अभिनयाबद्दल सांगायचं तर दीपिका पादुकोण ही उत्तम अभिनेत्री असल्याचं पुन्हा एकदा तिने सिद्ध केले. तर सिद्धांत चतुर्वेदीने देखील अभिनयातील वेगवेगळे पैलू दाखवले आहेत. तर अनन्या पांडे हिने देखील तिची भूमिका चांगल्यारित्या साकारली आहे. या तिघांशिवाय धैर्य करवाने देखील चांगले काम केले आहे. चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांची भूमिका छोटी होती, मात्र ती प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवून जाते. दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांची त्रिकोणी प्रेमकथेतील केमिस्ट्री पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहा.

Web Title: Gehraiyaan Movie Review: Read 'Deepness' of Complicated Relationships, How is Deepika's Cinema?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.