Raksha Bandhan 2024 : जिनिलियाने साजरे केले रक्षाबंधन, रितेशच्या मेहुण्याला पाहिलंत का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 04:10 PM2024-08-19T16:10:20+5:302024-08-19T16:11:44+5:30

अभिनेत्री जिनिलिया डिसुझा हिनेही भावाला भरभरून शुभेच्छा देत राखीपौर्णिमेचा सण साजरा केला.

Genelia Deshmukh D'Souza celebrated Raksha Bandhan 2024 penned a beautiful note for her brother | Raksha Bandhan 2024 : जिनिलियाने साजरे केले रक्षाबंधन, रितेशच्या मेहुण्याला पाहिलंत का ?

Raksha Bandhan 2024 : जिनिलियाने साजरे केले रक्षाबंधन, रितेशच्या मेहुण्याला पाहिलंत का ?

ओवाळीते मी भाऊराया... वेड्या बहिणीची वेडी ही माया... असं म्हणतं बहिण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा करण्याचे वचन मागते. बहिण- भावामधील प्रेम दृढ करणारा सण रक्षाबंधन (Rakshabandhan Celebration 2024).  दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला राखीचा सण साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधन १९ ऑगस्टला आहे. सण म्हटला की प्रत्येकाच्या घरीच उत्साहाचे वातावरण असते. मग ते अगदी हातावर पोट असणारा कष्टकरी वर्ग असो किंवा मग बॉलीवूड स्टार्स असो. अभिनेत्री जिनिलिया देशमुखनेदेखील राखीपौर्णिमा साजरी केली.

जिनिलिया देशमुखने सोशल मीडियावर तिच्या भावासोबतचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहलं, "प्रिय निगेल मला एक गोष्ट माहित आहे, की मी आयुष्यात कुठेही असले तरी आणि मला कधीही तुझी गरज भासली तर तू तिथे असशील. कोणत्याही बहिणीसाठी किंवा कोणत्याही माणसासाठी अशी एखादी व्यक्ती आयुष्यात असणं हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. माझ्यासाठी कायम उभा राहतो, त्यासाठी तुझे खूप आभार. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तु आयुष्यात जे काही मिळवले आहे. त्या सर्वांचा खूप अभिमान आहे. प्रगती करत राहा. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा".


जिनिलियाच्या माहेरच्या मंडळींविषयी...
जिनिलियाच्या माहेरी तिचे आईवडील आणि भाऊ-वहिनी आहेत. निल डिसुजा हे तिच्या वडिलांचे तर जेनेट डिसुजा हे आईचे नाव आहे. जिनिलियाच्या भावाचे नाव निगेल असे आहे. तर निगेलने लग्न पंजाबी तरुणीसोबत विवाह केला आहे. जिनिलिया आणि निगेलमध्ये खूप खास बॉन्डिंग आहे. जिनिलिया कायम आपल्या भावासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेम व्यक्त करत असते.

Web Title: Genelia Deshmukh D'Souza celebrated Raksha Bandhan 2024 penned a beautiful note for her brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.