Genelia Deshmukh : “तेव्हा अनेकांनी माझ्या हसण्यावरून...”, जिनिलिया वहिनींचा व्हिडीओ चर्चेत, बोलून दाखवलं मनातलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 06:27 PM2023-03-28T18:27:03+5:302023-03-28T18:29:07+5:30

Genelia Deshmukh : जिनिलियाचं नाव आठवलं तरी सर्वप्रथम आठवतं ते तिच्या चेहऱ्यावरचं हसू. तिचं खळखळून हसणं वेड लावतं. पण याच हसण्यासाठी कधीकाळी जिनिलियाला लोकांचे टोमणे ऐकावे लागलेले.

Genelia Deshmukh Shared Her Video And Talked About her smile | Genelia Deshmukh : “तेव्हा अनेकांनी माझ्या हसण्यावरून...”, जिनिलिया वहिनींचा व्हिडीओ चर्चेत, बोलून दाखवलं मनातलं दु:ख

Genelia Deshmukh : “तेव्हा अनेकांनी माझ्या हसण्यावरून...”, जिनिलिया वहिनींचा व्हिडीओ चर्चेत, बोलून दाखवलं मनातलं दु:ख

googlenewsNext

साऊथ चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आता महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब म्हणून ओळखली जाते. अभिनेता रितेश देखमुखसोबत (Riteish Deshmukh) लग्न झालं आणि जिनिलियाने स्वत:ला संसारात, मुलांच्या संगोपनात झोकून दिलं. पण नुकतंच तिने कमबॅक केल. वेड या मराठी सिनेमात ती झळकली आणि या सिनेमातील तिच्या अदाकारीचं प्रचंड कौतुक झालं. वेड या चित्रपटात श्रावणीची भूमिका तिने अशी काही रंगवली की सगळे तिच्या प्रेमात पडले. जिनिलियाचं नाव आठवलं तरी सर्वप्रथम आठवतं ते तिच्या चेहऱ्यावरचं हसू. तिचं खळखळून हसणं वेड लावतं. पण याच हसण्यासाठी कधीकाळी जिनिलियाला लोकांचे टोमणे ऐकावे लागलेले.

होय, सांगून खरं वाटणार नाही पण करिअरच्या सुरूवातीला अनेकांनी जिनिलियाला तिच्या हसण्यावरून नावं ठेवली. एका ताज्या पोस्टमध्ये खुद्द जिनिलिया यावर बोलली.  जिनिलियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जिनिलिया नेहमीप्रमाणे खळखळून हसताना दिसतेय.  

हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं, 'हसत राहण्याची आठवण करून देण्यासाठी ही पोस्ट. हसत राहा. हसणं हे फक्त एक उत्तम औषध नाहीये तर एका सामान्य दिवसाला सुदंर बनवण्याचं सामर्थ्य त्यात आहे. जेव्हा मी पहिल्यांदा अभिनयाची सुरुवात केली तेव्हा मला खूप लोकांनी एकच गोष्ट सुनावली. मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला.  तुझं हसू खूप जास्त मोठं आहे. तुला त्यावर काम करावं लागेल, असे सल्ले मला दिले गेलेत. जर मी त्यांचं ऐकलं असतं तर आज मी एक दुःखी व्यक्ती बनून स्वतःमधल्या त्या कमीपणावर रडत बसले असते. तुमच्यातील कमतरता नेहमीच स्पेशल असते. त्यामुळे, जे आहे त्यात आनंद माना...'  

३ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश आणि जिनिलियाचं लग्न झालं आणि ती बॉलिवूड अभिनेत्री लातूरची सूनबाई झाली. हे दाम्पत्य दोन गोंडस मुलांचे आईवडील आहेत.  

Web Title: Genelia Deshmukh Shared Her Video And Talked About her smile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.