लंदन ठुमकदा...! व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी जेनेलिया वहिनींचा धम्माल व्हिडीओ, पाहाल तर फिदा व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 05:28 PM2021-02-14T17:28:08+5:302021-02-14T17:29:11+5:30
या व्हिडीओत जेनेलिया लाल ड्रेसमध्ये लंदन ठुमकदा या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसतेय.
आज देशभर व्हॅलेन्टाईन डे उत्साहात साजरा होतोय. अशात जेनेलिया वहिनी का बरे मागे राहणार? व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर जेनेलिया डिसूजाने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
या व्हिडीओत जेनेलिया लाल ड्रेसमध्ये आहे आणि लंदन ठुमकदा या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसतेय. व्हिडीओतील जेनेनिया वहिनीच्या चेह-यावरचे एक्सप्रेशन पाहून चाहते खल्लास झाले आहे. केवळ चार तासांत लाखो लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.
लाल ड्रेसमधील दोन फोटोही तिने शेअर केले आहेत. जेनेलियाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय आहेत. रितेशसोबतच्या तिच्या टिकटॉक व्हिडीओंनी तर एकेकाळी धुमाकूळ घातला होता.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे बॉलिवूडचे बेस्ट कपल मानले जाते. 2 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली होती. या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. कारण जेनेलिया ख्रिश्चन होती तर रितेश हिंदू. रितेश आणि जेनेलियाची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. लग्नासाठी होकार द्यायला जेनेलियाने चक्क 8 वर्षे लावलीत, यावरून या लव्हस्टोरीचा अंदाज यावा.
2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून रितेशने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जेनेलिया त्याची हिरोईन होती. याच चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जेनेलियाची पहिल्यांदा नजरानजर झाली होती.
हैदराबाद विमानतळावर दोघेही पहिल्यांदा भेटले. आश्चर्य वाटेल, पण या पहिल्या भेटीत जेनेलियाने रितेशला जराही भाव दिला नव्हता. कारण त्यावेळी रितेशचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्याचा मुलगा असल्याने रितेश गर्विष्ठ असेल, असा जेनेलियाचा समज होता. त्यामुळे त्याने अॅटिट्यूड दाखवण्यापूर्वी जेनेलियानेच त्याला अॅटिट्यूड दाखवायला सुरुवात केली होती.