'सिंहिणीची डरकाळी ऐकण्यासाठी सज्ज व्हा..!', विद्या बालनच्या 'शेरनी'चा टीझर झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 02:38 PM2021-05-31T14:38:39+5:302021-05-31T14:39:04+5:30

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट शेरनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'Get ready to listen to the lioness's fear ..!', Teaser of Vidya Balan's 'Lioness' released | 'सिंहिणीची डरकाळी ऐकण्यासाठी सज्ज व्हा..!', विद्या बालनच्या 'शेरनी'चा टीझर झाला रिलीज

'सिंहिणीची डरकाळी ऐकण्यासाठी सज्ज व्हा..!', विद्या बालनच्या 'शेरनी'चा टीझर झाला रिलीज

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट शेरनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील विद्याच्या लूकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.ज्यात विद्या बालन घनदाट अशा जंगलात दिसते आहे. तर ट्रेलर २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या सोशल मीडियावर याबाबतची माहिती देताना लिहिले, काहीही फरक पडत नाही, ती योग्य गोष्टी करेल. २ जूनला ट्रेलर रिलीज होणार आहे. तर शेरनी जून, २०२१ ला प्राइमवर भेटीला येणार आहे.


तर विद्या बालनने लिहिले की, वाघांना त्यांचा मार्ग नेहमीच माहित असतो. सिंहिणीची डरकाळी ऐकण्यासाठी सज्ज रहा. ऑफिशिएल टीझर. २ जूनला रिलीज होणार ट्रेलर. शेरनी जून २०२१ला येणार भेटीला.


'शेरनी' या सिनेमाचे कथानक खिळवून ठेवणारे असून विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या रुपात आश्वासक भूमिकेत झळकणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाणेदार भूमिकेत विद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


चित्रपटाचे निर्माते विक्रम मल्होत्रा म्हणाले की, “२०२० मध्ये ‘शकुंतला देवी’वर प्रेमाचा वर्षाव झाला, इतक्या यशानंतर अबंडनशीया एंटरटेनमेंटची नवीनकोरी कलाकृती जगासमोर घेऊन जाताना पुन्हा एकदा अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि टी-सिरीजसोबत भागीदारी करताना मला आनंद होतो आहे. आम्ही काम करत असलेल्या शेरनीचे कथानक फारच विशेष आणि महत्त्वाचे आहे. विषयाला समर्पकत प्राप्त करून देण्यासाठी कायमच अमितची मार्गदर्शक भूमिका लाभली आहे. व्यंगात्मक टिपण्णी ही त्याची शैली सिनेमाला अधिक रोचक करते. विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा सिनेमा म्हणजे मेजवानी असणार आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वनाधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्या भेटीला येणार आहे”


टी-सीरीज आणि अबंडनशीया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, या अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचे दिग्दर्शन  पुरस्कार विजेता चित्रपटकार अमित मसुरकर याने केले आहे, ज्याला चित्रपट 'न्यूटन'साठी समीक्षकांनी गौरवले होते.

Web Title: 'Get ready to listen to the lioness's fear ..!', Teaser of Vidya Balan's 'Lioness' released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.