घटिका आली समीप... परिणीती अन् राघव यांच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 03:16 PM2023-05-09T15:16:03+5:302023-05-09T15:27:20+5:30

आता, चाहत्यांची उत्कंठा संपली असून या कपलच्या एंगेजमेंटची तारीख समोर आली आहे

Ghatika came near... It was time for Parineeti and Raghav to marry soon | घटिका आली समीप... परिणीती अन् राघव यांच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला

घटिका आली समीप... परिणीती अन् राघव यांच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे नेते खासदार राघव चड्ढा यांच्या भेटीगाठीमुळे ते गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात दिसत आहेत. बऱ्याच दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या बातम्याही येत आहेत. काही दिवसांपूर्वी परिणीती आणि राघव एकत्र लंच आणि डिनरसाठी दिसले होते. तर, IPL सामन्यावेळी क्रिकेटच्या मैदानतही त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. आता, चाहत्यांची उत्कंठा संपली असून या कपलच्या एंगेजमेंटची तारीख समोर आली आहे. घटिका समीप आली असून १३ मे रोजी त्यांचा साखरपुडा होणार असल्याचे वृत्त आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव पुढील आठवड्यात म्हणजे १३ मे रोजी  एंगेजमेंट करू शकतात. एका इंटिमेट रिंग सेरेमनीनंतर त्यांच्या नात्याला अधिकृत करतील. या एंगेजमेंट फंक्शनमध्ये फक्त त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होणार असल्याचे समजते. परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा १३ मे रोजी दिल्लीतच होणार असल्याचीही माहिती आहे. तर, याचवर्षी म्हणजे ऑक्टोबरमध्ये ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

दरम्यान, आपल्या बहिणीच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनस हेही ऑक्टोबरमध्ये लग्नाला उपस्थित राहू शकताता. कारण, त्याचवेळी Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलसाठी दोघेही भारतात येत आहेत. राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे आणि त्यांचे अनेक कॉमन फ्रेन्ड्स आहेत. 

दरम्यान, गेल्या महिन्यात AAP चे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करुन दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या. मी राघव चड्ढा आणि परीणीति चोप्रा यांना शुभेच्छा देतो, त्यांची सोबत प्रेम आणि आनंदाने भरभरुन जावो, असे ट्विट अरोरा यांनी केलं होतं.  

Web Title: Ghatika came near... It was time for Parineeti and Raghav to marry soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.