‘घायल’, ‘घातक’नंतर पुन्हा एकत्र येणार सनी देओल व राजकुमार संतोषी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 15:43 IST2018-11-28T15:42:24+5:302018-11-28T15:43:26+5:30
अभिनेता सनी देओलचे अॅक्टिंग करिअर सध्या धोक्यात आहे. अलीकडे एकापाठोपाठ एक आलेले त्याचे अनेक चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटलेत. अशात सनी देओलला दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मदतीचा हात देऊ केला आहे.

‘घायल’, ‘घातक’नंतर पुन्हा एकत्र येणार सनी देओल व राजकुमार संतोषी!
ठळक मुद्दे ९० च्या दशकात सनी देओल व राजकुमार संतोषी या जोडीने ‘दामिनी’, ‘घायल’, ‘घातक’ असे सुपरहिट चित्रपट दिलेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळाले.
अभिनेता सनी देओलचे अॅक्टिंग करिअर सध्या धोक्यात आहे. अलीकडे एकापाठोपाठ एक आलेले त्याचे अनेक चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटलेत. अशात सनी देओलला दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मदतीचा हात देऊ केला आहे. होय, ९० च्या दशकात सनी देओल व राजकुमार संतोषी या जोडीने ‘दामिनी’, ‘घायल’, ‘घातक’ असे सुपरहिट चित्रपट दिलेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळाले. आता राजकुमार संतोषी व सनी देओलची जोडी २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा एक चित्रपट घेऊन येतेय.
ताजी बातमी खरी मानाल तर, या चित्रपटाचे नाव ‘फतेह सिंह’ आहे. यात सनी फतेह सिंहची भूमिका वठवताना दिसेल. साजिद कुरैशी हा चित्रपट प्रोड्यूस करत आहेत. आधी हा चित्रपट अजय देवगणला आॅफर झाला होता. पण अजयने नकार दिला आणि हा चित्रपट सनीच्या झोळीत पडला. साहजिकच सनी यात धमाकेदार अॅक्शन करताना दिसणार आहे. तूर्तास सनी देओल मुलगा करण देओल याचा ‘पल पल दिल के पास’ हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. करण या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. करणचा हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होतोय.
गत २३ नोव्हेंबरला सनीचा ‘भैय्याजी सुपरहिट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट चांगले प्रदर्शन करेल, अश्ी अपेक्षा होती. पण पहिल्या चार दिवसांत या चित्रपटाने केवळ ४ कोटी रूपये कमावलेत. या चित्रपटाचा बजेट २० ते २५ कोटीच्या घरात होता. ही लागतही वसूल करणेही जाणकारांना कठीण वाटत आहेत. अशाच सनीला राजकुमार संतोषीची साथ मिळणार असेल तर नक्कीच चित्र आशादायी म्हणायला हवे.