ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली जॉर्जिया अँड्रियानी, लेटेस्ट फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 16:51 IST2021-01-05T16:45:11+5:302021-01-05T16:51:01+5:30
बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.

ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली जॉर्जिया अँड्रियानी, लेटेस्ट फोटो होतायेत व्हायरल
अरबाज खानची गर्लफ्रेंड म्हणजेच इटालियन मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीदेखील आपल्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळे चर्चेत येत असते. तसेच बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. जॉर्जिया अँड्रियानी हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच स्टनिंग दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
अरबाज खान इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतो आहे. दोघे एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसतात.जॉर्जिया अरबाज पेक्षा 22 वर्षांनी लहान आहे. वयात इतकं अंतर असताना ही दोघे एकमेकांसोबत खुश आहेत.
अनेक सर्वाजनिक ठिकाणी दोघ एकत्र स्पॉट झाले आहेत. जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे.
जॉर्जिया लवकरच 'वेलकम टू बजरंगपूर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यात श्रेयस तळपदे, संजय मिश्रा आणि तिग्मांशू धूलिया मुख्य भूमिकेत आहेत.