'विवाहित अभिनेत्यासोबत डेटवर जा'; करिअर सेट करण्यासाठी ऋचा चड्ढाला मिळाला होता विचित्र सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 14:19 IST2023-12-18T14:18:37+5:302023-12-18T14:19:04+5:30
Richa chadha: इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या ऋचाने तिच्या स्ट्रगल काळातील काही आठवणी शेअर केल्या आहेत.

'विवाहित अभिनेत्यासोबत डेटवर जा'; करिअर सेट करण्यासाठी ऋचा चड्ढाला मिळाला होता विचित्र सल्ला
दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीत आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे ऋचा चड्ढा (Richa chadha). आज ऋचा तिचा ३७ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. त्यामुळे तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी सोशल मीडियावर चर्चिल्या जात आहेत. यामध्येच २०१७ मध्ये ऋचाने दिलेली एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने एक किस्सा सांगितला. ज्यात एका विवाहित अभिनेत्यासोबत तिला डेटवर जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.
"ज्यावेळी मी इंडस्ट्रीत पदार्पण केलं त्यावेळी एका पीआरने मला विचित्र सल्ला दिला होता. त्याने मला सांगितलं की, या ठराविक अभिनेत्याला मेसेज कर आणि त्याच्यासोबत डेटवर जा. मी म्हटलं, पण त्याचं तर लग्न झालंय. त्यानंतर त्याने मला एका क्रिकेटरला मेसेज करायला सांगितला. त्याने मला सांगितलं की हे माझ्या पब्लिक इमेज आणि पीआरसाठी योग्य आहे", असं ऋचा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "जे लोक इंडस्ट्रीच्या बाहेरुन येतात त्यांचं कोणीही मार्गदर्शन केलेलं नसतं हे या लोकांना ठाऊक नसतं. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला रस्ता दाखवणारं कोणीही नसतं. इथे की काय केलं पाहिजे, काय करु नये असं सांगणारं कोणी नसतं. त्यामुळे इथे आपला रस्ता आपणच तयार करायचा असतो. त्यामुळेच इंडस्ट्रीच्या बाहेरुन आलेल्या लोकांना इथे त्यांचं स्थान भक्कम करायला वेळ लागतो."
दरम्यान, ऋचा सध्या तिच्या 'गर्ल विल बी गर्ल' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. या सिनेमाची निर्मिती अली फजल याच्या हाऊस पुशिंग बटन स्टुडिओ या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत केली जात आहे.