'इस हत्यारी को जेल में डाल दो',सुशांतचा गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह फोटो पाहून चाहते भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 15:53 IST2020-06-17T15:49:15+5:302020-06-17T15:53:14+5:30
निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या सुशांतला बाहेर काढण्याचा प्रयत्न रियाने अनेकदा केला.

'इस हत्यारी को जेल में डाल दो',सुशांतचा गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह फोटो पाहून चाहते भडकले
सुशांतच्या एग्झिटने अजुनही चाहते सावरलेले नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो पाहून चाहते अजूनच त्याच्या आठवीत रमताना दिसत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अकाली जाण्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. नैराश्यातून सुशांतने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, त्याचबरोबर त्याच्या मृत्यूसाठी अनेक गोष्टींना जबाबदार देखील धरलं जात आहे. अशात त्याने आत्महत्या केली यामागे त्याची कथिक गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तर जबाबदार नाही ना?अशाही चर्चा रंगत आहेत. लॉकडाऊन दरम्यान रिया सुशांतसहच राहत असल्याचे बोलले जाते. निधनाच्या काही वेळापूर्वीच रिया त्याच्या घरातून घाबरून निघून गेली होती. त्यामुळे रिया चक्रवर्तीचीसुद्धा चौकशी केली जाणार आहे.
तुर्तास नेटीझन्सही रियालाच जबाबदार धरत संताप व्यक्त करताना दिसतायेत. 'इस हत्यारी को जेल में डाल दो', तर एका युजरने लिहीले की, 'अगर बेवफा तुझको पहचान जाते, खुदा की कसम हम मोहब्बत ना करतेे. रियाच्या फोटोंवर उमटत असणा-या या प्रतिक्रीया पाहून चाहत्यांच्या मनात किती राग निर्माण झाला याची प्रचिती येते.
तसेच निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या सुशांतला बाहेर काढण्याचा प्रयत्न रियाने अनेकदा केला. सुशांतने औषध वेळेवर घ्यावीत योग्य उपचार घ्यावेत यासाठी सतत ती त्याच्या मागे लागायची. मात्र त्याने औषधं घेणं बंद केलं होतं असेही बोलले जात आहे.