पोराला श्वास तर घेऊ द्या...; आर्यन खान NCBच्या ताब्यात, शाहरूखआधी आली सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 03:28 PM2021-10-03T15:28:03+5:302021-10-03T15:35:59+5:30
Mumbai Cruise Drugs Bust : जहाजावरच्या रेव्ह पार्टीप्रकरणी आर्यन खानची सध्या एनसीबीकडून सखोल चौकशी सुरू आहे. अद्याप शाहरूख खानची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण बॉलिवूडची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अलिशान क्रूझवर छापा टाकत एनसीबीने एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. यादरम्यान एनसीबीने 8 जणांना ताब्यात घेतलं आणि यात शाहरूख खानचा (ShahRukh Khan) मुलगा आर्यन खान ( Aryan Khan) याचं नाव पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. आर्यन खानची सध्या एनसीबीकडून सखोल चौकशी सुरू आहे. अद्याप शाहरूख खानची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण बॉलिवूडची पहिली प्रतिक्रिया आली आहे. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने ( Suniel Shetty) यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Suniel Shetty reacts to Shah Rukh Khan’s son Aryan Khan being detained by NCB)
काय म्हणाला सुनील शेट्टी?
#WATCH | When a raid is conducted at a place, many people are taken into custody. We assume that a particular boy must have consumed it (drugs). The process is on. Let's give that child a breather. Let real reports come out: Actor Sunil Shetty on NCB raid at an alleged rave party pic.twitter.com/qYaYSsxkyi
— ANI (@ANI) October 3, 2021
शाहरूखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेतल्याप्रकरणी सुनील शेट्टीला प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर सुनील शेट्टी म्हणाला, ‘जेव्हा केव्हा रेड पडते तेव्हा अनेक लोकांना ताब्यात घेतलं जातं. अशात त्या मुलानेही ड्रग्जचे सेवन केलं असावं, असं आपण मानून चालतो. त्या मुलाला (आर्यन खान)थोडा श्वास तर घेऊ द्या. खरं काय ते समोर येऊ द्या. बॉलिवूडमध्ये एखादी घटना घडली की, मीडिया तुटून पडतो. सरळ सरळ निष्कर्ष काढून मोकळा होतो. त्या मुलाला संधी द्या. त्या मुलाची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे.’
Clear footage of #AryanKhan being arrested! pic.twitter.com/2qex3i7n4l
— Scoop Beats (@thescoopbeats) October 3, 2021
एनसीबी अधिका-यांना आर्यन खानचे क्रुझवरील व्हिडीओ मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये आर्यन स्पष्टपणे दिसत आहे.
एनसीबी अधिका-यांनी आर्यन खानचा मोबाईल फोन जप्त केला आहे. सध्या त्याच्या चॅट्स आणि अन्य टेक्स्ट मेसेजची तपासणी केली जात आहे. त्याच्या व्यतिरिक्त ताब्यात घेण्यात आलेल्या इतरांचेही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, आर्यन खान यानं एनसीबीच्या अधिका-यांनी केलेल्या चौकशीत आपल्याला पार्टीत व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावलं होतं. त्याच्याकडून क्रूझवर येण्यासाठी कोणतीही फी घेण्यात आली नव्हती. याशिवाय माझ्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावलं होतं, अशी माहिती दिली आहे.