Video: राहा कपूरची पुन्हा दिसली झलक, न्यू इयर साजरा करुन मुंबईत परतले रणबीर-आलिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 17:01 IST2024-01-05T17:00:38+5:302024-01-05T17:01:27+5:30
राहाला घेऊन कारमध्ये बसतानाचा रणबीरचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गुलाबी रंगाच्या हुडीमध्ये राहा खूपच क्यूट दिसत आहे.

Video: राहा कपूरची पुन्हा दिसली झलक, न्यू इयर साजरा करुन मुंबईत परतले रणबीर-आलिया
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटची (Alia Bhatt) लाडकी लेक राहा कपूरचा (Raha Kapoor) चेहरा ख्रिसमसच्या दिवशी सर्वांना दिसला. त्यानंतर राहाच्याच व्हिडिओ, फोटोंचा सगळीकडे धुमाकूळ होता. ख्रिसमसला रणबीर-आलियाने चाहत्यांना हे खास सरप्राईजच दिलं होतं. आता पुन्हा एकदा राहाची झलक दिसली आहे. रणबीर आणि आलिया नुकतेच न्यू इयर साजरे करुन परत आले आहेत. तेव्हा राहाला घेऊन कारमध्ये बसतानाचा रणबीरचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
गोरी पान, निळे डोळे, गुबगुबीत गाल अशा राहाच्या लूकने सोशल मीडियावर सर्वांनाच वेड लावलं. राहा नक्की कोणासारखी दिसते यावर मीडियात चर्चा सुरु झाली. ख्रिसमसनंतर राहाला पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रणबीर आणि आलिया नवीन वर्षाचं स्वागत करुन नुकतेच परतले आहेत. प्रायव्हेट एअरपोर्टवर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. रणबीरने काळ्या रंगाचा शर्ट तर डोक्यावर राऊंड टोपी घातली आहे. तसंच आलियाही अगदीच कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. रणबीरने राहाला कडेवर घेतलं आहे. गुलाबी रंगाच्या हुडीमध्ये राहा खूपच क्यूट दिसत आहे. तसंच तिच्या हातात खेळणंही दिसत आहे. विमानप्रवासाने राहाला थोडी कंटाळलेलीही दिसत आहे. Voompla या इन्स्टाग्राम पेजवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
रणबीर कपूरचं राहावर किती प्रेम आहे हे त्याच्या प्रत्येक व्हिडिओतून दिसून येतं. तो ज्या प्रेमाने तिला उचलून घेतो, तिच्याकडे बघतो हे नेटकऱ्यांच्याही लक्षात आलं आहे. कपूर कुटुंबाच्या या व्हिडिओवरही नेटकऱ्यांनी 'सो क्युट' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.