Harish Magon Death : 'गोल माल' फेम अभिनेते हरीश मेगन यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर पसरली शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 10:48 AM2023-07-03T10:48:49+5:302023-07-03T10:55:17+5:30
'गोल माल', 'नमक हलाल' आणि 'इंकार' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते हरीश मेगन यांचं निधन झालं.
'गोल माल', 'नमक हलाल' आणि 'इंकार' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते हरीश मेगन यांचं निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हरीश यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी आरुषी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (CINTAA) त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. रिपोर्ट्सनुसार, ते मुंबईत एक अॅक्टिंग इन्स्टिट्यूट' चालवत होते, ते बराच काळ फिल्मी जगतापासून दूर होते.
हरीशचा यांचा जन्म ६ डिसेंबर १९४६ रोजी झाला. त्यांनी FTII मधून अभिनयाचे धडे घेतले आणि १९७४ च्या बॅचचे ते विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांनी फिल्मी दुनियेत प्रवेश केला. त्याच्या हिट सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर त्यात 'नमक हलाल', 'चुपके चुपके', 'खुशबू', 'इंकार', 'मुकद्दर का सिकंदर', 'गोल माल' आणि 'शहेनशाह' यांचा समावेश आहे.
हरीश हे शेवटचे 1997 मध्ये आलेल्या 'उफ्फ ये मोहब्बत' चित्रपटात दिसले होते.
१९७५ मध्ये, ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, त्यांनी “चुपके चुपके” चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. १९९७ मध्येच त्यांनी अभिनय सोडला आणि ते मुंबईत 'हरीश मेगन अॅक्टिंग इन्स्टिट्यूट' या नावाने चित्रपट प्रशिक्षण संस्था चालवत असत. चित्रपट इतिहासकार पवन झा यांनीही ट्विटरवर हरीश मगेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.