​गोलमाल अगेन नंतर गोलमाल ५ प्रेक्षकांच्या भेटीला?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 08:42 AM2017-10-28T08:42:40+5:302017-10-28T14:13:53+5:30

गोलमालचे आजवरचे सगळेच भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या आणि तिसऱ्या भागाने तर बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले ...

Golmaal Again After 5 Weeks Of Golmaal? | ​गोलमाल अगेन नंतर गोलमाल ५ प्रेक्षकांच्या भेटीला?

​गोलमाल अगेन नंतर गोलमाल ५ प्रेक्षकांच्या भेटीला?

googlenewsNext
लमालचे आजवरचे सगळेच भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या आणि तिसऱ्या भागाने तर बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले होते. गोलमालचा चौथा भाग म्हणजेच गोलमाल अगेन दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन करत आहे. अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर, तब्बू, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू, परिणिती चोप्रा, जॉनी लिव्हर, प्रकाश राज यांच्या सगळ्यांच्या भूमिकांचे प्रचंड कौतुक केले जात आहे. गोलमान अगेनचे यश पाहाता आता या टीमने गोलमान ५ ची देखील तयारी सुरू केली आहे. गोलमाल ५ ची तयारी सुरू असल्याचे संकेत रोहित आणि त्याच्या टीमने अनेक मुलाखतींमध्ये दिले आहेत.  
गोलमाल अगेनच्या टीमने बॉलिवूड लाइफ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत गोलमाल ५ ची कथा काय असणार आहे याविषयी सांगितले आहे. गोलमाल अगेन या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी, परिणिती चोप्रा, अर्शद वारसी, तुषार कपूर, तब्बू, श्रेयस तळपदे, कुणाप खेमू यांनी या चित्रपटाची कथा अशी असणार, या चित्रपटाची कथा तशी असणार असे म्हणत सगळ्यांना पूर्णपणे कन्फ्यूज केले. पण चित्रपटाची कथा काय असणार याबाबत काहीच कळू दिले नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेविषयी लोकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. गोलमाल ५ वर काम सुरू झाले असल्याचे रोहित आणि त्याच्या टीमने संकेत दिले असल्यामुळे या चित्रपटाच्या अधिकृत घोषणेची लोक वाट पाहात आहेत. 
गोलमाल अगेन आणि सिक्रेट सुपरस्टार हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. सिक्रेट सुपरस्टारची निर्मिती अभिनेता आमिर खानने केली असून या चित्रपटात त्याची छोटीशी भूमिका देखील आहे. या चित्रपटाला समीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण गोलमाल अगेनच्या तुलनेत सिक्रेट सुपरस्टारला बॉक्स ऑफिसवर तितकासा गल्ला जमवता आला नाही. गोलमालने आतापर्यंत १३६ कोटीहून अधिक पैसे कमावले असल्याचे म्हटले जात आहे. 

Also Read : अजय देवगणच्या ‘गोलमाल अगेन’ने तोडला शाहरूख खानचा रेकॉर्ड!

Web Title: Golmaal Again After 5 Weeks Of Golmaal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.