Good News..! अभिनेता जिशू सेनगुप्ता बनणार सिंगल फादर, जाणून घ्या हे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 17:11 IST2021-04-24T17:10:47+5:302021-04-24T17:11:35+5:30
अभिनेता जिशू सेनगुप्ताने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ही गुड न्यूज ऐकून त्याचे चाहतेही हैराण झालेत.

Good News..! अभिनेता जिशू सेनगुप्ता बनणार सिंगल फादर, जाणून घ्या हे प्रकरण
शकुंतला देवी, मणिकर्णिका आणि मर्दानी २ यासारख्या चित्रपटातील भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेता जिशू सेनगुप्ताने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ही गुड न्यूज ऐकून त्याचे चाहतेही हैराण झालेत. त्याला कारणही तसेच आहे जिशू सेनगुप्ता सिंगल वडील होणार आहे.
जिशू सेनगुप्ता सिंगल बाप बनणार आहे. सरोगसीच्या माध्यमातून जिशूच्या घरी एक नाही तर दोन बाळांचे पाळणे हलणार आहेत. हे त्याच्या खऱ्या आयुष्यात नाही तर रील लाइफमध्ये घडणार आहे. विंडो प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेला चित्रपट बाबा बेबी ओमध्ये जिशू गुप्ता एक दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. मागील वर्षी निर्माते नंदिता रॉय आणि शिबोप्रसाद मुखर्जीने या चित्रपटाचे पोस्टर लाँच करून या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
या चित्रपटातील भूमिकेबद्दल जिशू सेनगुप्ता म्हणाला की, या चित्रपटाची कथा वेगळी आहे. मी अशापद्धतीची भूमिका यापूर्वी केलेली नाही. लहान मुलांसोबत काम करणे, माझ्यासाठी सर्वात सुखद अनुभव राहिला आहे. कारण त्यांच्यासोबत काम करून मला खूप आनंद आणि सकारात्मक उर्जा मिळाली आहे. मी एका वर्षानंतर बंगाली सिनेमात काम केले आहे. माझ्यासाठी चांगला अनुभव होता. आशा आहे की प्रेक्षकांना आमचे काम आवडेल.
अरित्रा मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा एका सिंगल फादरवर आधारीत आहे. ज्यात जुळ्या मुलांचे संगोपन, आयुष्यातील चढउतार आणि संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी मार्च महिन्यात बंगालमध्ये झाले आणि एप्रिलमध्ये कोरोनाला लक्षात घेता शेड्युल पूर्ण केले आहे.