Good News! अभिनेत्री लिसा हेडन झाली तिसऱ्यांदा आई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 11:34 AM2021-07-02T11:34:23+5:302021-07-02T11:34:46+5:30

लिसा हेडनने २०१६ साली लंडनमधील बिझनेसमन दिनो लालवानीशी लग्न केले.

Good News! Actress Lisa Hayden became a mother for the third time | Good News! अभिनेत्री लिसा हेडन झाली तिसऱ्यांदा आई

Good News! अभिनेत्री लिसा हेडन झाली तिसऱ्यांदा आई

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन हिने तिसऱ्यांदा आनंदाची बातमी दिली आहे. लिसाने अतिशय हटके अंदाजात आपल्या चाहत्यांना ती आई झाल्याची आनंदाची वार्ता दिली आहे. लिसाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. लिसाने मुलीला जन्म दिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली नाही. तिने आपल्या चाहत्यांच्या कमेंटवर खुशखबर दिली आहे. 

लिसा हेडनच्या चाहत्याने तिला इंस्टाग्रामवर विचारले की, तुमचे तिसरे बाळ कुठे आहे? लिसाने चाहत्याच्या कमेंटवर रिप्लाय देत म्हटले की,'माझ्या कुशीत.' लिसाची ही प्रतिक्रिया वाचून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


फेब्रुवारी २०२१ मध्ये लिसाने सोशल मीडियावर ती तिसऱ्यांदा गरोदर असल्याची माहिती दिली. जूनला तिने आपल्या तिसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. यावेळी लिसाने मुलगा जॅकसमवेत एक व्हिडिओही पोस्ट केला होता, ज्यात तिने तिला मुलगी होणार असल्याचे सांगितले. तेव्हा पासून लिसा बेबी बंपसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने बेबी शॉवरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.


लिसा हेडनने २०१६ साली लंडनमधील बिझनेसमन दिनो लालवानीसोबत विवाह केला होता. २०१७ मध्ये तिने पहिला मुलगा जॅकचा जन्म झाला. त्यानंतर २०२० साली मुलगा लिओचा जन्म झाला. 


लिसा हेडनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने बॉलिवूडमध्ये आयशा चित्रपटातून पदार्पण केले होते. शेवटची ती 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटात झळकली होती.

Web Title: Good News! Actress Lisa Hayden became a mother for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.