गुड न्यूज...! अखेर इरफान खानने न्यूरो एंडोक्राइन ट्युमरवर केली मात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 03:03 PM2019-04-03T15:03:08+5:302019-04-03T15:08:11+5:30

अभिनेता इरफान खान बऱ्याच कालावधीपासून न्यूरो एंडोक्राईन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी सामना करत होता. अखेर त्याने या आजारावर मात केली आहे.

Good news ...! Finally, Irfan Khan has hit Neuro Endocrine Tumors | गुड न्यूज...! अखेर इरफान खानने न्यूरो एंडोक्राइन ट्युमरवर केली मात

गुड न्यूज...! अखेर इरफान खानने न्यूरो एंडोक्राइन ट्युमरवर केली मात


अभिनेता इरफान खान बऱ्याच कालावधीपासून न्यूरो एंडोक्राईन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी सामना करत होता. अखेर त्याने या आजारावर मात केली आहे. उपचार पूर्ण करून इरफान भारतात परतला आहे. दोन दिवसांपूर्वी तो छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसला होता. यावेळी इरफानने चेहऱ्यावरील मास्क हटवून मीडियाला पोझ दिली होती. आता इरफानने ट्विटर अकाउंटवर भावूक होऊन चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

इरफान खानने मागील वर्षी १६ मार्चला आपल्या आजाराची माहिती ट्विटरवर दिली होती. जेव्हा त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली होती. तसेच बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील इरफान लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना केली होती. जवळपास ९ ते १० महिन्यांच्या उपचारानंतर इरफान खान बरा झाला आहे.


इरफानने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले. त्याने जे त्याच्या कठीण वेळी त्याच्यासोबत कोणत्या ना कोणत्या रुपात सोबत राहिले, त्या सर्वांना इरफानने धन्यवाद केले आहे.



 

सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेता इरफान खान लवकरच २०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिंदी मीडिया' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

यासोबतच असे वृत्त समोर आले होते की, इरफानला शूजीत सरकारचा 'उधम सिंग' चित्रपटाची देखील ऑफर केली होती. मात्र नंतर या चित्रपटात विकी कौशलची वर्णी लागली. इरफान शेवटचा कारवां चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याच्यासोबत दलकीर सलमान व मिथिला पालकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Good news ...! Finally, Irfan Khan has hit Neuro Endocrine Tumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.