Good News..! गायिका श्रेया घोषाल बनली आई, गोंडस मुलाला दिला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 16:57 IST2021-05-22T16:57:25+5:302021-05-22T16:57:45+5:30
Shreya Ghoshal Blessed With Baby Boy : श्रेया घोषालने आई झाल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आज तिच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे.

Good News..! गायिका श्रेया घोषाल बनली आई, गोंडस मुलाला दिला जन्म
श्रेया घोषालने ती आई झाल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आज तिच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे. ही बातमी तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
श्रेया घोषालने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले की, आज दुपारी देवाच्या कृपेने आमच्या घरी पुत्र रत्न जन्मले आहे. ही खूप इमोशनल भावना आहे जी यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. शैलादित्य आणि आमचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. तुम्ही दिलेले प्रेम आणि आशीर्वादासाठी तुमचे खूप आभारी आहे.
काही महिन्यांपूर्वी श्रेया घोषालने सोशल मीडियावर आई होणार असल्याचे सांगितले होते. त्यावेेळी तिने बेबी बॅम्पसोबतचा फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करून लिहिले होते की, 'बेबी श्रेयादित्य येणार आहे! शिलादित्य मुखोपाध्याय आणि मला ही बातमी तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे. आपल्या प्रेम आणि आशीर्वादांची आवश्यकता आहे, कारण आम्ही आमच्या जीवनात या नवीन अध्यायसाठी स्वतःला तयार केले आहे. '
५ फेब्रुवारी २०१५ रोजी पार्श्वगायिका श्रेया घोषालने तिचे बालपणीता मित्र शिलादित्यशी लग्न केले. श्रेया आणि शिलादित्य हे बालपण मित्र होते. शिलादित्य Hipcask.com वेबसाइटचे संस्थापक आहेत.
श्रेयाने २००२ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटातून पार्श्वगायनाच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने 'सिलसिला ये चाहत का', 'बॅरी पिया', 'छलक छलक', 'मोरे पिया' आणि 'डोला रे डोला' अशी पाच गाणी गायली. यानंतर, तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.