Good News Trailer : स्पर्मसोबत उडालेल्या गोंधळात विनोदाचा भडीमारा, जाणून घ्या ट्रेलरबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 15:59 IST2019-11-18T15:58:51+5:302019-11-18T15:59:31+5:30
Good News Movie's Trailer : अक्षय कुमार व करीना कपूर यांचा आगामी चित्रपट 'गुड न्यूज'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

Good News Trailer : स्पर्मसोबत उडालेल्या गोंधळात विनोदाचा भडीमारा, जाणून घ्या ट्रेलरबद्दल
अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट गुड न्यूजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट आयव्हीएफ टेक्नॉलजीवर आधारीत असून २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१९ सालाची दमदार सुरूवात केसरी चित्रपटाने करत वर्षाखेरीस अक्षय कुमारगुड न्यूज चित्रपटाने ट्रिट देण्यास सज्ज झाला आहे.
गुड न्यूजच्या ट्रेलरमध्ये दोन जोडप्यांची कथा सांगण्यात आली आहे ज्याचं आडनाव सेम आहे. ते म्हणजे बत्रा. हे दोघंही मुलासाठी आयव्हीएफ टेक्नॉलजी अवलंबतात. दिलजीत दोसांज - कियारा अडवाणी, अक्षय कुमार व करीना कपूर यांच्या गुड न्यूजमध्ये गोंधळ उडतो. रुग्णालयात या जोडप्याचे सरनेम सेम असल्यामुळे त्यांचे स्पर्म मिक्स होतात. त्यामुळे करीनामध्ये दिलजीत व कियारामध्ये अक्षयचे स्पर्म ट्रान्सफर होतात. स्पर्म मिक्सअप झाल्यामुळे मग गोंधळ उडतो, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.
वेगळ्या विषयावर आधारीत गुड न्यूज चित्रपट कॉमिक अंदाजात सादर केला आहे. दिलजीत दोसांझचे पंचेस भारी आहेत. करीना व अक्षयची केमिस्ट्री पहायला खूप चांगली वाटते. गुड न्यूज चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप भावतो आहे. ९ वर्षानंतर अक्षय कुमार व करीना कपूर गुड न्यूज चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
यापूर्वी ते दोघे २००९ साली कमबख्त इश्कमध्ये दिसले होते. गुड न्यूज चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहताने केलं आहे. तसेच कियारा व दिलजीतसुद्धा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.