लग्नाआधीच ‘या’ अभिनेत्रींनी दिली होती ‘गुड न्यूज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:47 AM2018-11-28T11:47:08+5:302018-11-28T11:47:52+5:30
बॉलिवूडमध्ये अशा अजून काही हिरोईन्स आहेत, ज्या लग्नाआधीच प्रेग्नंट झालेल्या आहेत. विशेषत: त्यांनी प्रेग्नंसीबाबत लपवत घाई-घाईत लग्न उरकले.
-रवींद्र मोरे
शीर्षक वाचून सर्वसामान्यांना थोडा धक्काच बसेल, मात्र बॉलिवूडमध्ये या गोष्टी विशेष नाहीत. याठिकाणी लव, अफेअर होणे एक सामान्य बाब मानली जाते. त्यातच दोघांमध्ये जवळीकता प्रस्थापित होणे हे स्वाभाविकच. उदाहरण द्यायचं झालं तर नेहा धुपिया आणि अंगद बेदी. नेहा लग्नाअगोदरच प्रेग्नंट होती, त्यामुळे त्यांनी गुपचूप आणि घाईत लग्न उरकवले. बॉलिवूडमध्ये अशा अजून काही हिरोईन्स आहेत, ज्या लग्नाआधीच प्रेग्नंट झालेल्या आहेत. विशेषत: त्यांनी प्रेग्नंसीबाबत लपवत घाई-घाईत लग्न उरकले. अशाच हिरोईन्सबाबत या पॅकेजमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
* अमृता अरोरा
बॉलिवूड अभिनेत्री आणि मलाइका अरोराची बहीण असलेल्या अमृताही लग्नाअगोदर प्रेग्नंट होती. तिने जेव्हा बिझनेसमन शकील लडक यांच्याशी लग्न केले तेव्हा लग्नाची काहीही चर्चा नव्हती. त्यानंतर काही दिवसांतच अमृता प्रेग्नंट असल्याच्या बातम्या समोर आल्या.
* सेलिना जेटली
सेलिना जेटलीचे लग्न दुबईच्या प्रसिद्ध हॉटेल उद्योगपतीशी होणार आहे अशी घोषणा जेव्हा झाली होती तेव्हाच सेलेना प्रेग्नंट असल्याचा संशय निर्माण झाला होता. आणि हा संशय तेव्हा खरा ठरला जेव्हा २३ जुलै २०११ ला लपून लग्न करणारी सेलिना १२ मार्च २०१२ ला जुळ्या मुलांची आई बनली. या दोन्ही तारखांतील काळ आठ महिन्यांपेक्षा कमीचा आहे. याचा अर्थ सेलिना लग्नाआधीच प्रेग्नंट होती.
* महिमा चौधरी
'परदेस' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री महिमा चौधरीही लग्नापूर्वी प्रेग्नेंट होती. तिने व्यावसायिक बॉबी मुखर्जीबरोबर १९ मार्च २००६ मध्ये लग्न केले होते. त्यावेळी महिमा ५ महिन्यांची प्रेग्नंट होती. ३ जुलैला महिमाने आर्यना नावाच्या मुलीला जन्म दिला.
* वीणा मलिक
पाकिस्तानी अॅक्ट्रेस वीणा मलिकदेखील या यादीत आहे. दुबईच्या एका बिझनेसमॅनबरोबर तिची एंगेजमेंट होती, त्याच काळात ती प्रेग्नंट असल्याचे समोर आले. पण ते बाळ तिच्या होणाºया नवºयाचे नव्हे तर एक्स बॉयफ्रेंडचे असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर घाई-घाईत काही आठवड्यांत तिने लग्न केले.