अक्षय-करिनाच्या Good Newwz सिनेमाची बॉक्स घौडदौड, तीन दिवसांत पार केला इतक्या कोटींचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 04:44 PM2019-12-30T16:44:10+5:302019-12-30T17:06:46+5:30

Good Newwz Movie Box Office Collection : पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. 

Good newwz box office collection day 3 akshay kumar film crossed 50 cr in only three days | अक्षय-करिनाच्या Good Newwz सिनेमाची बॉक्स घौडदौड, तीन दिवसांत पार केला इतक्या कोटींचा आकडा

अक्षय-करिनाच्या Good Newwz सिनेमाची बॉक्स घौडदौड, तीन दिवसांत पार केला इतक्या कोटींचा आकडा

googlenewsNext

अक्षय कुमार, करिना कपूर, दलसित दोसांज आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या गुड न्यूज बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. 



अवघ्या तीन दिवसांत या सिनेमाने 64. 99 कोटी कमाई केली आहे. चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.  शुक्रवारी या सिनेमाने  18 कोटींची कमाई केली. शनिवारी  21. 78 कोटी तर रविवारी 26.65 कोटी इतकी कमाई करत या सिनेमाने तीन दिवसात गुडन्यूजने 50 कोटींचा आकडा सहज पार केला आहे.  


31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दोन दिवसांत हा सिनेमा बक्कळ कमाई करेल असा अंदाज तरण आदर्श यांनी व्यक्त केला आहे.  त्यामुळे पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल. 


गुड न्यूज या चित्रपटाचा विषय हा आजवरच्या बॉलिवूड चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. दिग्दर्शक राज मेहता ‘गुड न्युज’ हा अत्यंत आगळ्यावेगळ्या विषयावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत.

आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने चित्रपटातील दोन्ही जोडपे अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. पण, त्यात जो काही गोंधळ उडतो, त्यातून चित्रपटात धम्माल गमतीजमतींचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे कथानक हे अत्यंत मनोरंजक आणि गंमतीदार असे असून ‘गुड न्यूज’ हा अत्यंत कॉमेडी, रोमान्स आणि धम्माल गंमतीजमतींचा पॅकेज चित्रपट आहे.

Web Title: Good newwz box office collection day 3 akshay kumar film crossed 50 cr in only three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.