करिना कपूरने सिद्ध केले ती आहे बॉलिवूडची क्वीन, जाणून घ्या काय आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 19:29 IST2020-01-11T19:25:14+5:302020-01-11T19:29:39+5:30
करिना कपूरचा गुड न्यूज नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

करिना कपूरने सिद्ध केले ती आहे बॉलिवूडची क्वीन, जाणून घ्या काय आहे कारण
करिना कपूरने रेफ्युजी या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या बॉलिवूडमधील करियरला आता 20 वर्षांहून अधिक काळ झाला असून तिने तिच्या आजवरच्या करियरमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. एकाच साच्यातील भूमिका न साकारता नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा तिने प्रयत्न केला आहे.
कभी खुशी कभी गममधील पू, जब वी मेट मधील गीत, वीर दे वेडिंग मधील कालिंदी, गुड न्यूजमधील दिप्ती या सगळ्याच तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली आहे. गुड न्यूजमधील तिच्या भूमिकेचे तर सध्या चांगलेच कौतुक होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
करिना गेल्या 20 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आज तिची गणना केली जाते. एका ट्रेंड एक्स्पर्टनुसार, मुमताज, हेमा मालिनी, श्रीदेवी आणि माधुरी दिक्षीत या आजवर चार सुपरस्टार अभिनेत्री झाल्या आहेत. करिना देखील बॉलिवूडमध्ये काही वर्षं कार्यरत राहिली तर ती नक्कीच पाचवी सुपरस्टार अभिनेत्री होईल आणि बॉलिवूडच्या इतिहासात तिचे देखील नाव नमूद केले जाईल.
करिना आता गुड न्यूजनंतर प्रेक्षकांना लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिची जोडी आमिर खानसोबत जमणार आहे. तसेच ती करण जोहरच्या तख्त या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.