गुडबाय २०१७ : लैंगिक शोषणावर केले मोठे खुलासे; या अभिनेत्रींनी सांगितली आपबिती!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 11:18 AM2017-12-30T11:18:52+5:302017-12-30T16:53:23+5:30
२०१७ हे वर्ष अनेक खळबळजनक खुलाशांचे राहिले आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण बॉलिवूडमध्ये असे काही खुलासे ...
स्वरा भास्कर
अभिनेत्री स्वरा भास्कर हिने चित्रपटात काम देण्यासाठी तिच्याकडे कशा पद्धतीने शरीरसुखाची मागणी केली गेली, याबाबतचा एक खुलासा केला. स्वरा भास्करने म्हटले होते की, चित्रपटात काम देण्याच्या मोबदल्यात माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती. मी नकार दिल्यानंतर मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.
राधिका आपटे
राधिकानेदेखील या कॅम्पेनचा भाग बनताना खळबळजनक खुलासा केला होता. राधिकाने म्हटले होते की, एकदा मला एका चित्रपटासाठी कॉल आला होता. त्या व्यक्तीने मला एकांतात भेटण्याची मागणी केली. मी त्याला नकार दिला. अन्यथा मी पण लैंगिक शोषणाला बळी पडली असती.
मल्लिका दुआ
मल्लिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना म्हटले होते की, वयाच्या सातव्या वर्षी माझे लैंगिक शोषण झाले. तिने लिहिले होते की, ‘मी पण... स्वत:च्या कारमध्ये, माझी आई कार चालवित होती, तर तो माझ्यासोबत मागच्या सीटवर बसला होता. पूर्ण प्रवासात त्याचा हाथ माझ्या स्कर्टमध्ये होता. त्यावेळी माझे वय केवळ सात वर्षे होते, तर माझी बहीण ११ वर्षांची होती. त्याचा एक हाथ माझ्या स्कर्टमध्ये तर एक हाथ माझ्या बहिणीच्या पाठीवर होता. माझे वडील त्यावेळी दुसºया कारमध्ये होते. जेव्हा त्यांना ही बाब कळाली तेव्हा त्यांनी त्याला चोप दिला होता. कारण त्याच रात्री त्यांनी त्याला रंगेहाथ पकडले होते.
इशिता दत्ता
टीव्ही अभिनेत्री इशिता दत्तानेही असाच खळबळजनक खुलासा केला. तिने म्हटले की, मीदेखील अशाप्रकारच्या घटनेचा सामना केला. कॉलेजला जाताना मी छेडछाडीच्या घटनेला बळी पडली. मी रेल्वेने कॉलेजला जात असे. एकदा मला कोणीतरी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तो अतिशय वयस्कर व्यक्ती होता. मात्र मी शांत बसली नाही. मी संपूर्ण गर्दीसमोर त्याला सटकून काढले.
मुनमुन दत्ता
मुनमुन दत्ताने या कॅम्पेनअंतर्गत केलेल्या खुलाशामुळे तर एकच खळबळ उडाली होती. मुनमुन एका पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘मी पण... होय मी पण, मला हे बघून आश्चर्य वाटत आहे की, समाजातील काही चांगल्या वृत्तीच्या पुरूषांना हे बघून धक्का बसत आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला याविषयावर बिंधास्तपणे बोलत आहेत. मात्र मला असे वाटते, याविषयावर बोलण्याची गरज आहे. लहानपणी मलादेखील अशाप्रकारचा सामना करावा लागला. जेव्हा मी माझ्या शेजारील अंकलला बघून घाबरत असे. कारण त्यांना जेव्हा संधी मिळायची ते मला पकडत असत. तसेच मला धमकी देत की हे सर्व कोणालाही सांगू नये.