बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या मागे लागले पाकिस्तान, गुगलवर करतायेत तिला सर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 07:12 PM2019-12-12T19:12:05+5:302019-12-12T19:19:40+5:30

भारतापाठोपाठ पाकिस्ताननेही गुगलवर सर्च केलेल्या व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे.

Google trends search 2019 sara ali khan among most searched personalty in pakistan | बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या मागे लागले पाकिस्तान, गुगलवर करतायेत तिला सर्च

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या मागे लागले पाकिस्तान, गुगलवर करतायेत तिला सर्च

googlenewsNext

भारतात यावर्षी सर्वात सर्च केल्या गेलेल्या व्यक्तींची यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे नव्हे तर एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानी विमानांनी केलेला हल्ला परतवून लावणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे. आता भारतापाठोपाठ पाकिस्ताननेही त्यांच्या गुगल सर्च इंजिनची यादी प्रसिद्ध केली आहे आणि यात चक्क बॉलिवूडच्या अभिनेत्रीने टॉप 10 च्या यादीत स्थान मिळवले आहे.

साराशिवाय यायादीत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान  आणि भारताचे नागरिकत्त्व स्वीकारलेले गायक अदनान सामी. 


सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने बॉलिवूडमध्ये केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून डेब्यू केला होता.

तिच्या या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकलीत. सारा अली खान सध्या बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चांगले चित्रपट देत आहे. साराचे वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग हे दोघेही अतिशय प्रसिद्ध अभिनेते आहेत.

 साराने देखील तिच्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिच्या केदारनाथ या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले. त्यानंतर सिम्बा या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले. लव्ह आज कल 2 आणि कुली नं 1 या चित्रपटांमध्ये ती लवकरच झळकणार असून तिचे फॅन्स तिच्या या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

Web Title: Google trends search 2019 sara ali khan among most searched personalty in pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.