संरक्षणावरील बजेटमध्ये कपात करून सरकारने महिलांना मोफत सॅनेटरी पॅड्स द्यावेत : अक्षयकुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 12:54 PM2018-01-16T12:54:26+5:302018-01-16T18:24:26+5:30

महिलांच्या मासिक पाळीदरम्यान अत्यावश्यक असलेल्या सॅनेटरी नॅपकिनचे महत्त्व सांगणाºया ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या खिलाडी अक्षयकुमार व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान ...

Government should give free sanitary pad to women by cutting budget on safety: Akshay Kumar | संरक्षणावरील बजेटमध्ये कपात करून सरकारने महिलांना मोफत सॅनेटरी पॅड्स द्यावेत : अक्षयकुमार

संरक्षणावरील बजेटमध्ये कपात करून सरकारने महिलांना मोफत सॅनेटरी पॅड्स द्यावेत : अक्षयकुमार

googlenewsNext
िलांच्या मासिक पाळीदरम्यान अत्यावश्यक असलेल्या सॅनेटरी नॅपकिनचे महत्त्व सांगणाºया ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या खिलाडी अक्षयकुमार व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान त्याने एक वक्तव्य करताना सरकारकडे विनंती केली की, संरक्षण क्षेत्रातील एकूण बजेटमध्ये पाच टक्के कपात करून महिलांना मोफत पॅड्स उपलब्ध करून द्यावेत. अक्षयकुमारने याअगोदरही सरकारला बरेचसे सल्ले दिले आहेत. गेल्यावर्षी त्याने शहिदांच्या परिवाराला आर्थिक मदत करता यावी याकरिता एक पोर्टल सुरू करण्याची कल्पना सरकारकडे बोलून दाखविली होती. त्यानुसार गृहमंत्रालयाने एक पोर्टल लॉन्च केले.  

पुण्यात पत्रकारांशी बोलताना अक्षयकुमारने म्हटले की, ‘महिला टॅक्स फ्री सॅनेटरी नॅपकिनची मागणी करीत आहेत. पण मला असे वाटते की, हे पूर्णत: मोफत उपलब्ध करून द्यायला हवे. कारण महिलांच्या आरोग्याशी संबंधित हा खूपच गंभीर विषय आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील आर्थिक तरतुदीवर पाच टक्के कपात करून महिलांना सॅनेटरी नॅपकिन मोफत द्यायला हवेत. यावेळी अक्षयकुमारने मासिक पाळी आणि सॅनेटरी नॅपकिनविषयी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी अभियान चालविले जावे, असे अपीलही केले. 

ALSO READ : ‘त्या’ अभिनेत्रीने मासिक पाळी असतानाही भरपावसात रडत-रडत केले शूटिंग : अक्षयकुमार

आर. बाल्की दिग्दर्शित अक्षयकुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनांथम यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी ग्रामीण दुर्गम भागातील महिलांसाठी स्वस्तात सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले. या चित्रपटाची निर्माती अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना आहे. अक्षयसोबत चित्रपटात राधिका आपटे आणि सोनम कपूरच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट मिसेज् फनीबोन्स बॅनरअंतर्गत बनविण्यात आला आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होणार असून, त्याची थेट फाइट प्रचंड वादग्रस्त ‘पद्मावत’ या चित्रपटाशी होणार आहे. 

Web Title: Government should give free sanitary pad to women by cutting budget on safety: Akshay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.