कष्टानं मिळवलेलं स्टारडम एकाएकी कसं संपलं? गोविंदाला ही एकच चूक नडली, आजही होतो पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 08:00 AM2021-12-21T08:00:00+5:302021-12-21T08:00:02+5:30

Govinda Birthday : 90 च्या दशकात गोविंदा म्हटलं की, त्याच्या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडत. पण हळूहळू हे स्टारडम संपलं. आताश: तो फक्त रिअ‍ॅलिटी शोमध्येच दिसतो...

govinda birthday special about career biggest mistake in life unknown facts | कष्टानं मिळवलेलं स्टारडम एकाएकी कसं संपलं? गोविंदाला ही एकच चूक नडली, आजही होतो पश्चाताप

कष्टानं मिळवलेलं स्टारडम एकाएकी कसं संपलं? गोविंदाला ही एकच चूक नडली, आजही होतो पश्चाताप

googlenewsNext

Govinda Birthday : बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ म्हणजे गोविंदा (Govinda). त्याचा हटके डान्स आणि कॉमेडीच्या परफेक्ट टायमिंगवर लोक फिदा होते. आजही आहेत. गोविंदा फेमस झाला तो त्याच्या अतरंगी डान्स स्टेप्समुळे, प्रत्येकाला थिरकायला भाग पाडतील अशा त्याच्या गाण्यांमुळे. लाल पॅन्ट आणि पिवळा शर्ट घालून नाचायचं धाडस त्या काळात फक्त एकट्या गोविंदानेच केलं. 

त्याच्या डान्स इतकाच त्याचा कॉमिक सेन्सही तेवढाच तगडा होता. त्यामुळेच 90 च्या दशकात गोविंदा म्हटलं की, त्याच्या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडत. पण हळूहळू हे स्टारडम संपलं. जणू गोविंदा हिट चित्रपटाचा फॉर्मुलाच विसरा की काय? असा प्रश्न पडावा इतपत 90 च्या दशकानंतर तो अचानक गायब झाला. आताश: तो अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसतो पण  त्याचा हिट सिनेमे देण्याचा सिलसिला पूर्णपणे थांबला आहे. गोविंदाचं फिल्मी करिअर एकाएकी कसं थांबलं? हा प्रश्न आजही चाहत्यांना पडतो तो म्हणूनचं.  
एका मुलाखतीत खुद्द गोविंदानेच या प्रश्नाचं  उत्तर दिलं होतं. करिअर संपलं, यासाठी त्याने नेपोटिज्मवर खापर फोडलं नव्हतं. पण बॉलिवूडमधील अनेक पॉवर सेंटरबाबत तो बोलला होता.

‘मी कोणत्याही मोठ्या ग्रुपसोबत (पॉवर सेन्टर) जोडला गेलो नव्हतो. ही एकच गोष्ट माझ्या करिअरला मारक ठरली.  एखाद्या बड्या हाउस किंवा ग्रुपसोबत जोडलेला राहिलो असतो तर चांगलं काम, चांगले सिनेमे मिळाले असते. बॉलिवूड एक मोठा परिवार आहे.  तुम्ही सगळे एकत्र चालत राहाल तर तुम्हाला काम मिळत राहील,’ असं तो म्हणाला होता. 
 वाईट काळात अनेक लोकांनी माझ्च्या अडचणीत भर घातली आणि मी संकटाच्या मालिकेतून बाहेर येण्याऐवजी या दलदलीत आणखी रूतत गेलो, असंही तो म्हणाला होता.

 दिग्दर्शक डेव्हिड धवनसोबत चा गोविंदाचा  वाद कुणापासूनही लपलेला नाही. डेव्हिड धवनसोबत गोविंदाने ‘शोला और शबनम’ केला आणि ही जोडी सुपरहि झाली. यापाठोपाठ ‘आँखें’ या चित्रपटानेही छप्परफाड कमाई केली आणि मग या जोडीने मागे वळून पाहिलंच नाही. हिरो नं १, कुली नं १, बडे मियाँ छोटे मियाँ, राजा बाबू, दिवाना मस्तान, दुल्हे राजा, हसीना मान जायेगी, पासून ते अगदी पार्टनर पर्यंत या जोडीने कमाल धमाल सिनेमे लोकांना दिले. पण कालांतराने दोघांचं असं काही ‘फाटलं’ की आज दोघंही एकमेकांचं तोंड  पाहणं  देखील पसंत करत नाहीत.
  

Web Title: govinda birthday special about career biggest mistake in life unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.