गोविंदाच्या ‘रंगीला राजा’ला प्रेक्षक मिळेना! रद्द करावे लागले शो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 02:31 PM2019-01-20T14:31:35+5:302019-01-20T14:39:13+5:30

९० च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता गोविंदाचे करिअर सध्या गटांगळ्या खाताना दिसतेय. होय, गत ११ वर्षांत त्याचे चित्रपट धडाधड आपटत आहेत. गोविंदाच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. पण त्याचे अलीकडचे चित्रपट मात्र चाहत्यांना जराही भावलेले नाहीत.

Govinda film Rangeela Raja not getting audiance | गोविंदाच्या ‘रंगीला राजा’ला प्रेक्षक मिळेना! रद्द करावे लागले शो!!

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’ला प्रेक्षक मिळेना! रद्द करावे लागले शो!!

googlenewsNext

९० च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता गोविंदाचे करिअर सध्या गटांगळ्या खाताना दिसतेय. होय, गत ११ वर्षांत त्याचे चित्रपट धडाधड आपटत आहेत. गोविंदाच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. पण त्याचे अलीकडचे चित्रपट मात्र चाहत्यांना जराही भावलेले नाहीत. नुकताच गोविंदाचा ‘रंगीला राजा’ नामक चित्रपटप्रदर्शित झाला. पण या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. इतकेच नाही तर रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षक नसल्याने ‘रंगीला राजा’ अनेक ठिकाणचे शो रद्द करावे लागलेत.


सेन्सॉर बोर्डाने ‘रंगीला राजा’त   २० कट्स सुचवले होते. यानंतर ‘रंगीला राजा’चे निर्माते पहलाज निहलानी यांनी कोर्टात धाव घेतली होती. शिवाय सेन्सॉर बोर्डावरही  आगपाखड केली होती. गोविंदानेही या  पार्श्वभूमीवर काही गंभीर आरोप केले होते.  काही लोक माझ्याविरोधात कट रचत असून माझा चित्रपट प्रदर्शित होऊ देत नसल्याचा आरोप गोविंदाने केला होता.
आत्तापर्यंत गोविंदाचे सलग ११ सिनेमे दणकून आपटले. अर्थात तरिही गोविंदा थांबला नाही. तो चित्रपट करत राहिला. हेच कारण आहे की, गोविंदा स्वत:ला फ्लॉप समजत नाही. कुठलाही कलाकार तोपर्यंत फ्लॉप ठरत नाही, जोपर्यंत तो स्वत:ला फ्लॉप समजत नाही. मी कधीही हरलो नाही, घाबरलो नाही आणि कधी मागे वळून बघितले नाही, असे गोविंदा म्हणतो, ते म्हणूनच.
१९९३ मध्ये गोविंदाचा ‘जख्मों का हिसाब’ सुपरडुपर फ्लॉप ठरला. यानंतर दुसºयाचवर्षी आलेला त्याचा ‘इक्का राजा रानी’ही फ्लॉप झाला. १९९८ मध्ये आलेला ‘परदेसी बाबू’ही दणकून आपटला. यानंतरचा ‘राजाजी’, ‘महाराजा’, ‘हम तुमपे मरते है’, जिस देश में गंगा रहता है, अंखियों से गोली मारे, नॉटर एट ४० हे त्याचे सिनेमेही फ्लॉप ठरलेत.

Web Title: Govinda film Rangeela Raja not getting audiance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.