2 आठवड्यात तब्बल 49 चित्रपट करायचा साईन, आज एका चित्रपटासाठी राजा बाबूला करावं लागतोय संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 06:19 PM2023-03-18T18:19:00+5:302023-03-18T18:22:49+5:30

गोविंदाने सांगितलं एकेकाळी तो 2 आठवड्यात 49 चित्रपट साइन करत असे.

Govinda once used to sign 49 films in 2 weeks actor rejected blockbuster movie taal and devdas now craving for one film | 2 आठवड्यात तब्बल 49 चित्रपट करायचा साईन, आज एका चित्रपटासाठी राजा बाबूला करावं लागतोय संघर्ष

2 आठवड्यात तब्बल 49 चित्रपट करायचा साईन, आज एका चित्रपटासाठी राजा बाबूला करावं लागतोय संघर्ष

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराच्या करिअरमध्ये एक वेळ अशी येते जेव्हा त्याला भरपूर काम आणि प्रसिद्धी मिळते. ९० च्या दशकात बॉलिवूडमधील कॉमेडी अभिनेता गोविंदानेही बरीच प्रशंसा मिळवली होती. त्या काळात त्यांचे चित्रपट धमाल करायचे. जरी आता असे दिसते की अभिनेत्याचे करिअरला उतरती कळा लागलीय.  बर्‍याच दिवसांपासून तो कोणत्याही चित्रपटातही दिसत नाही, तर गोविंदाने त्याच्या काळात भन्साळींसारख्या चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट नाकारले होते. याचा खुलासा खुद्द गोविंदाने केला आहे.

गोविंदाने त्याच्या काळात अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये हिरो नंबर वन, कुली नंबर वन अशा अनेक उत्तम चित्रपटांचा समावेश आहे. त्या काळात गोविंदा आणि करिश्मा कपूरची जोडी खूप गाजली होती. दोघांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण काही काळानंतर त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आणि त्याच वेळी तो राजकारणाकडे वळला आणि एकेकाळी मुंबई अंधेरीचे खासदार झाला, पण तेथे त्याची कारकीर्द फार काळ यशस्वी होऊ शकली नाही.

नाकारले तालसारखे चित्रपट
गोविंदाने 2018 साली आजतकला दिलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाचे खुलासे केले होते. त्याने सांगितले होते की, एकेकाळी तो फक्त 2 आठवड्यात 49 चित्रपट साइन करत असे. त्याच्या चित्रपटांची शूटिंग पूर्ण करण्यासाठी त्याला वेळ मिळाला नाही. गोविंदाला त्याच्या प्रत्येक चित्रपटात पहावे असे मेकर्सना नेहमीच वाटत होते. आज जरी गोविंदा आपल्या चित्रपट कारकिर्दीला पुनरुज्जीवित करण्यासाठी झटत असला तरी त्याने एकेकाळी ताल आणि देवदास सारखे चित्रपट सोडले होते. गोविंदाने सांगितले होते की, हे चित्रपट केवळ त्याच्यासाठीच नव्हते. त्याला देवदासमध्ये चुन्नीलालची भूमिका ऑफर करण्यात आली होती. अनिल कपूरची ताल मधील भूमिका गोविंदाला ऑफर करण्यात आली होती. जो त्याने नाकारली. 

गोविंदाला पाहताच फ्लॉप असण्याचा टॅग लावला जाऊ लागला, असे चित्रपट जाणकारांचे मत आहे. 'पार्टनर' नंतर गोविंदाने डझनभर चित्रपटात काम केले पण त्याचा एकही चित्रपट हिट झाला नाही. त्याचा रणवीर सिंगसोबतचा 'किल दिल' हा चित्रपटही यशस्वी होऊ शकला नाही. आदित्य चोप्रासोबतचा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर वितरक गोविंदापासून दुरावले आहेत.

Web Title: Govinda once used to sign 49 films in 2 weeks actor rejected blockbuster movie taal and devdas now craving for one film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.