१०० कोटींचे प्रोजेक्ट सोडले; गोविंदाचा खुलासा, म्हणाला, 'आरशात बघून स्वत:ला...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 10:23 AM2023-09-20T10:23:05+5:302023-09-20T10:23:39+5:30

गोविंदाने काल कुटुंबासह गणेश चतुर्थी साजरी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गोविंदा म्हणाला,

govinda rejected 100 crore film offers last year says i dont accept roles immediatley | १०० कोटींचे प्रोजेक्ट सोडले; गोविंदाचा खुलासा, म्हणाला, 'आरशात बघून स्वत:ला...'

१०० कोटींचे प्रोजेक्ट सोडले; गोविंदाचा खुलासा, म्हणाला, 'आरशात बघून स्वत:ला...'

googlenewsNext

बॉलिवूडचा चीची म्हणजेच गोविंदाने (Govinda) ९० चा काळ गाजवला. त्याच्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. गोविंदा चाहत्यांचा खूपच लाडका बनला. त्याची डान्स करण्याची स्टाईल तर काही औरच. पण आता सगळ्यांचा चहेता गोविंदा मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. 'पार्टनर' नंतर त्याचा एकही सिनेमा फारसा चालला नाही. गोविंदाच्या जबरदस्त कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काल गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर गोविंदाने त्याच्या कामाविषयी एक खुलासा केला. गेल्या वर्षी १०० कोटींचा प्रोजेक्ट सोडल्याची खंत त्याने व्यक्त केली. 

गोविंदाने काल कुटुंबासह गणेश चतुर्थी साजरी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गोविंदा म्हणाला,'मी सहज ऑफर स्वीकारत नाही. पण ज्यांना असं वाटतं की मला काम मिळत नाहीए त्यांना मी सांगू इच्छितो की माझ्यावर बाप्पाची कृपा आहे. मी गेल्या वर्षीच १०० कोटी रुपयांचे प्रोजेक्ट नाकारले आहेत.'

तो पुढे म्हणाला, 'मी आरशासमोर उभं राहून स्वत:च्याच कानाखाली मारत होतो कारण मी कोणताच प्रोजेक्ट साईन करत नव्हतो. ते खूप जास्त पैसे ऑफर करत होते पण मला अशा प्रकारच्या भूमिका करायच्या नव्हत्या. जसं काम मी याआधी केलं आहे तसंच मला आता करायचंय.'

गोविंदाने १९८६ साली 'लव 86' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. त्याचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. गोविंदा एका रात्रीत स्टार झाला. त्याने आपल्या करिअरमध्ये 'आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या','एक और एक ग्यारह','सँडवीच','कुली नंबर १' अशा अनेक  सुपरहिट सिनेमात काम केलं आहे.

Web Title: govinda rejected 100 crore film offers last year says i dont accept roles immediatley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.