बी.आर.चोप्रांच्या 'महाभारत'साठी मिळालेली ऑफर, दिला नकार; गोविंदाने सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:55 IST2025-03-11T13:53:44+5:302025-03-11T13:55:35+5:30
'महाभारत'मधील भूमिका रिजेक्ट केल्याने त्याला ऑफिसमधून बाहेर काढण्यात आलं होतं असा त्याने खुलासा केला.

बी.आर.चोप्रांच्या 'महाभारत'साठी मिळालेली ऑफर, दिला नकार; गोविंदाने सांगितला किस्सा
अभिनेता गोविंदा (Govinda) सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या पायाला गोळी लागली होती. नंतर आता पत्नीसोबतच्या घटस्फोटामुळे तो चर्चेत आला. तर आता अभिनेता एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीत त्याने अनेक इंडस्ट्रीवर गंभीर आरोप केले आहेत. तर आता बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत'मधील भूमिका रिजेक्ट केल्याने त्याला ऑफिसमधून बाहेर काढण्यात आलं होतं असा त्याने खुलासा केला.
मुकेश खन्ना यांच्याशी बातचीत करताना गोविंदा म्हणाला, "रेणु चोप्रासोबत माझी चांगली मैत्री होती. मी त्यांच्या घरीही अनेकदा जायचो. एक दिवस मला बी आर चोप्रांनी ऑफिसमध्ये बोलवलं. त्यांनी मला महाभारत मध्ये अभिमन्युची भूमिका ऑफर झाली होती. मात्र माझ्या आईने मला या भूमिकेला नकार द्यायला सांगितलं. माझी आई साध्वी होती आणि तिने मला ही भूमिका न करण्याचा सल्ला दिला होता."
तो पुढे म्हणाला, "तेव्हा मी बीआर चोप्रांकडे इन्फ्लुएन्शियल फिगर म्हणून बघत नव्हतो. माझा नकार त्यांना अजिबात आवडला नव्हता. त्यांनी माझ्या आईला वेडी आहे ती असंही संबोधलं. ते जरा संतापले होते. मी त्यांना म्हणालो सर, 'माझ्या आईने शारदा हा पहिला सिनेमा केला होता. तिने ९ सिनेमे केले आहेत. ती तुमची सीनिअर आहे. माझे वडीलही सीनिअर आहेत. मी स्ट्रगल करतोय. ती जे सांगते तेच होतं.' मी नंतर जेव्हा आईला हे सांगितलं तेव्हा तिने मला त्यांच्यासमोर जाऊन अभिनय करण्याचा सल्ला दिला. तसंच तुमचा विचार मी खाल्ला असंही सांगितलं. नंतर बीआर चोप्रांनी मला हा पागल आहे म्हणत बाहेर काढलं होतं."