मुलीचे निधन झाल्याने खचून गेला होता गोविंदा; आर्थिक तंगीचा करावा लागला सामना!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 09:39 AM2017-12-21T09:39:23+5:302017-12-21T15:09:23+5:30

बॉलिवूडमध्ये कॉमेडी किंग या नावाने आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता गोविंदा आज त्याचा ५४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. ...

Govinda was deteriorated due to his daughter's death; Financial crisis has been fought against! | मुलीचे निधन झाल्याने खचून गेला होता गोविंदा; आर्थिक तंगीचा करावा लागला सामना!

मुलीचे निधन झाल्याने खचून गेला होता गोविंदा; आर्थिक तंगीचा करावा लागला सामना!

googlenewsNext
लिवूडमध्ये कॉमेडी किंग या नावाने आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता गोविंदा आज त्याचा ५४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. २१ डिसेंबर १९६३ मध्ये जन्मलेल्या गोविंदाने वयाच्या २३ व्या वर्षीच आपल्या करिअरला सुरुवात केली. १९८६ मधील ‘लव ८६’ हा गोविंदाचा पहिला चित्रपट होता. गोविंदा अरुण अहुजा असे पूर्ण नाव असलेल्या गोविंदाने १९८७ मध्ये सुनीतासोबत लग्न केले. गोविंदाने खूपच कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:चा लौकिक निर्माण केला. कारण त्याच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघायचे. गोविंदा जेव्हा-जेव्हा पडद्यावर एंट्री करायचा तेव्हा तेव्हा सिनेमागृहात शिट्या अन् टाळ्यांचा एकच कल्लोळ ऐकावयास मिळत असे. गोविंदाच्या आयुष्यात एक दिवस तर असाही आला, ज्यामध्ये त्याला ३६ तासांत तब्बल १४ चित्रपट साइन करावे लागले. मात्र सध्या गोविंदाला एक चित्रपट मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. वास्तविक गोविंदाचे जीवन सुरुवातीपासूनच संघर्षपूर्ण राहिले आहे. त्यामुळे सुखाबरोबर दु:खाचाही त्याला वारंवार सामना करावा लागला आहे. त्याच्या चाहत्यांना विश्वास बसणार नाही, परंतु गोविंदाने आतापर्यंत त्याच्या आयुष्यात ११ आप्तस्वकियांचे निधन बघितले आहे.

एका मुलाखतीत गोविंदाने स्वत:च त्याच्या आयुष्याशी निगडित काही दु:खद क्षण सांगितले. गोविंदाने म्हटले की, मी माझ्या आयुष्यात एक-दोन नव्हे तर तब्बल ११ मृत्यू बघितले आहेत. त्यापैकीच एक मृत्यू माझ्या मोठ्या मुलीचा आहे. होय, टीना गोविंदाची मोठी मुलगी नाही, तर टीना अगोदर गोविंदा आणि सुनीताला एक मोठी मुलगी होती. चार महिन्यांची असतानाच या मुलीचे निधन झाले. वृत्तानुसार गोविंदाची ही मुलगी प्री-मॅच्योर होती. ज्यामुळे ती अधिक काळ जगू शकली नाही. याव्यतिरिक्त गोविंदाने आपले आई-वडील, दोन कझन, बहीण आणि मेहुणा यांचे निधन बघितले. बहिणींच्या मुलांचा सांभाळ स्वत: गोविंदा करीत आहे. 



दरम्यान, जेव्हा आपल्या चार महिन्यांच्या मुलीचे निधन झाले तेव्हा गोविंदा खूपच दु:खी झाला होता. मीडियाशी बोलताना गोविंदाने सांगितले होते की, मुलीच्या निधनानंतर सगळं काही बदलून गेलं होतं. माझ्या सर्व कंपन्या बंद पडल्या होत्या. ज्यामुळे माझ्यावर प्रचंड फायनेंशियल प्रेशर आले होते. या सर्व अडचणींतून मार्ग काढत मी आयुष्य जगत गेलो. आयुष्यात खूपच चांगले वाईट दिवस बघितल्यानंतर आज मी हे स्थान प्राप्त करू शकलो, असेही गोविंदाने सांगितले. 

Web Title: Govinda was deteriorated due to his daughter's death; Financial crisis has been fought against!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.