तुस्सी ग्रेट हो, खिलाडी अक्षय कुमारने केलेले हे काम वाचून, तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 12:25 PM2020-01-30T12:25:14+5:302020-01-30T12:25:36+5:30
‘मिशन मंगल’ सिनेमाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अभिनेता अक्षय कुमारला बॉलीवुडचा खिलाडी नंबर वन असं म्हटलं जातं. त्याचा अभिनय, कॉमेडीचं टायमिंग यासह त्यांच्या स्टंट्सचे सारेच फॅन आहेत. एक हरहुन्नरी अभिनेता असण्यासोबतच त्याने कायम माणूसकी आणि साधेपणा जपला आहे. मुळात बॉलीवूडमध्ये आपल्या सहकार्याला मदत करणारे तसे कमीच मात्र अक्षय कुमार या गोष्टीला नेहमीच अपवाद ठरतो. ‘मिशन मंगल’ सिनेमाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अक्षयला जगन शक्ती यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळताच त्याने त्याच्या टीमला दिग्दर्शकांचा संपूर्ण खर्च उचलण्यास सांगितले. तसंच त्यांच्या घरातल्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजीही घेण्यास सांगितले आहे. अक्षय कुमारने केलेले हे काम नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. त्यामुळे पुन्हा एकदा समाजाचे ऋण मानणार्या, माणुसकी जपणार्या, संवेदनशील अक्षयचा ही कामगीरी वाचून माणुसकी अजून देखील शिल्लक आहे हेच स्पष्ट होते.
या अभिनेत्यानं वर्षात कमावले तब्बल ७०० कोटी, लो बजेट सिनेमांनीही जमवला चांगला गल्ला
प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे. त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले होते.विशेष म्हणजे अक्षय कुमारचे 4 ही सिनेमा सुपर हिट ठरले. 'केसरी', 'मिशन मंगल', 'हाउसफुल 4' आणि 'गुड न्यूज' चारही सिनेमांनी मिळून ७०० रुपये कोटींची कमाई केली. एका वर्षात 700 कोटी कमावणारा अक्षय कुमार पहिला अभिनेता ठरला आहे, त्याच्या कमी बजेटच्या सिनेमांनीही चांगली कमाई करण्यात यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षात अक्षयने आपलं मानधन दुप्पट केले असून प्रत्येक सिनेमासाठी तो तब्बल ५४ कोटी मानधन घेतो.