Guess Who: फोटोत टशनमध्ये पोझ देणारा हा चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 08:00 AM2023-03-11T08:00:00+5:302023-03-11T08:00:01+5:30
Guess The Celebrity: आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो चाहते आनंदाने पाहतात. म्हणूनच रोज असे नवे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतोय.
Guess The Celebrity: बॉलिवूड स्टार त्यांच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. चाहते आपल्या आवडत्या स्टार्सबद्दलची अगदी बारीक-सारीक गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक असतात. आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो चाहते आनंदाने पाहतात. म्हणूनच रोज असे नवे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो आहे बॉलिवूडच्या एका लोकप्रिय सुपरस्टारचा. फोटोतील चिमुकला आपल्या वडिलांसोबत अगदी स्टाईलमध्ये पोझ देताना दिसतोय. त्याची स्टाईल, त्याची हेअर स्टाईल लक्ष वेधून घेतेय. आज फोटोतील हाच चिमुकला बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. आपल्या दमदार ॲक्टिंग व अदाकारीने त्याने सर्वांना वेड लावलं आहे. अद्यापही तुम्ही त्याला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो.
फोटोत वडिलांसोबत पोझ देणारा हा चिमुरडा दुसरा तिसरा कुणी नसून अजय देवगण (Ajay Devgn) आहे. या फोटोत अजय देवगण त्याचे वडील वीरू देवगणसोबत उभा आहे. एका शिक्षक दिनी खुद्द अजयने वडिलांसोबतचा हा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. माझे वडील, माझे गुरू..., त्यांनी मला आयुष्यातील अमूल्य धडे शिकवलेत, असं कॅप्शन देत त्याने हा फोटो पोस्ट केला होता.
खरं तर हिरो होण्याचं स्वप्नं अजयने कधीच पाहिलं नव्हतं. ते त्याच्या बाबांचं स्वप्नं होतं. होय, वीरू देवगण यांना हिरो बनायचं होतं. पण त्यांचं हिरो बनण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. हे स्वप्न त्यांनी आपल्या मुलाच्या माध्यमातून पूर्ण केलं. अजयला हिरो बनण्याच्या ध्यासानं वीरू देवगण यांना पछाडलं होतं. त्यांनी अजयला कडक ट्रेनिंग दिलं. अगदी सकाळी 6 वाजता उठण्यापासून तर वर्कआऊट, डान्स शिकवण्यापर्यंत. वीरू देवगण आज आपल्यात नाहीत. पण याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, एअरकंडिशनमध्ये झोपणाऱ्या मुलासाठी सकाळी 6 वाजता उठणं कठीण असतं. कारण त्याला सवय नसते. अजयला ही सवय लावण्यासाठीच मला 4-6 महिने लागलेत. लवकर उठ, जुहू बीचवर जा, म्हणून मी त्याच्यामागे तगादा लावायचो. त्यासाठी स्पेशल जिम बनवली गेली होती. तिथे जाऊन वर्कआऊट कर, डान्स टीचर येणार, त्यांच्याकडून डान्स शिक, जुहू बीचवर जाऊन फाईटर ट्रेनिंग घे, असं सगळं मी त्याला सांगायचो आणि त्याच्याकडून करवून घ्यायचो.