​गुल पनाग बनली फार्म्युला ई रेसिंग कार चालवणारी पहिली भारतीय महिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2017 05:42 AM2017-04-30T05:42:01+5:302017-04-30T11:12:01+5:30

बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग हिने एक नवा किर्तीमान स्थापित केला आहे. फार्म्युला ई रेसिंग कार चालवणारी गुल पनाग पहिली भारतीय महिला बनली आहे.

Gul Panag became the first Indian woman to run the Formula E racing car! | ​गुल पनाग बनली फार्म्युला ई रेसिंग कार चालवणारी पहिली भारतीय महिला!

​गुल पनाग बनली फार्म्युला ई रेसिंग कार चालवणारी पहिली भारतीय महिला!

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री गुल पनाग हिने एक नवा किर्तीमान स्थापित केला आहे. फार्म्युला ई रेसिंग कार चालवणारी गुल पनाग पहिली भारतीय महिला बनली आहे. रेसिंग कारमध्ये पाऊल ठेवण्याआधी गुलने त्याचे प्रशिक्षण घेतले होते. रेसिंग कार चालवण्यासाठी एक खूप मोठा अनुभव शिवाय फिटनेस लागतो. गुल या दोन्ही कसोट्यांवर खरी ठरली. 





सध्या गुलचे अ‍ॅक्टिंग करिअर संपल्यात जमा आहे. यापूर्वी अनेकदा गुल बाईक व कार राईड करताना दिसलीय. पण आता ती फार्म्युला वन रेसर ड्राईव्हर बनली आहे.  गुलने या क्षणांचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे.  फार्म्युला ई रेसिंग ड्राईव करतानाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गुल पनाग एम4 इलेकट्रो चालवताना दिसते आहे. ही महिन्द्राच्या चौथ्या पिढीची फार्म्युला वन रेसिंग कार आहे.

{{{{twitter_video_id####}}}}


गुल पनाग  गत बुधवारी बार्सिलोनामध्ये महिन्द्रा कार रेसिंगमध्ये सहभागी झाली. येथे तिने  फार्म्युला ई रेसिंग ड्राईव केली. महिन्द्रा रेसिंगने याबाबत माहिती दिली आहे.

{{{{twitter_video_id####}}}}


  मोटर स्पोर्ट हा गुल पनागचा आवडता छंद. याबाबत ती कमालीची पॅशेनेट आहे. याबाबत ती म्हणते, मोटर स्पोर्ट माझे पॅशन आहे. एक इलेक्ट्रिक रेस होणार आहे, हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रत्यक्षात  एम4 इलेकट्रो रेसिंग कार चालवण्याचा अनुभव अद्भूत होता.



आम आदमी पार्टीच्या तिकिटावर पंजाबमधून २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवणाºया गुलने ‘डोर’,‘धूप’,‘मनोरमा सिक्स फीट अंडर’,‘हॅलो’ आणि ‘अब तक छप्पन’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.

Web Title: Gul Panag became the first Indian woman to run the Formula E racing car!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.