‘गुंजन सक्सेना’ बायोपिकमध्ये दाखवल्या चुकीच्या गोष्टी...! गुजंनच्या कोर्समेटने लिहिली पोस्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:37 PM2020-08-18T12:37:28+5:302020-08-18T12:39:17+5:30

अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल’ नव्या वादात

gunjan saxena coursemate sreevidya rajan slams biopic syas factually incorrect | ‘गुंजन सक्सेना’ बायोपिकमध्ये दाखवल्या चुकीच्या गोष्टी...! गुजंनच्या कोर्समेटने लिहिली पोस्ट!!

‘गुंजन सक्सेना’ बायोपिकमध्ये दाखवल्या चुकीच्या गोष्टी...! गुजंनच्या कोर्समेटने लिहिली पोस्ट!!

googlenewsNext
ठळक मुद्देफेसबुकबवर एक लांबलचक पोस्ट लिहून श्रीविद्या यांनी अनेक दावे केले आहेत.  

अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल’ या सिनेमाची घोषणा झाली अगदी तेव्हापासूनच तो वादात सापडला आहे. आता या सिनेमावर निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट श्रीविद्या राजन यांनी भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. चित्रपटात चुकीची तथ्य दाखवण्यात आल्याचा दावा श्रीविद्या राजन यांनी केला आहे. श्रीविद्या या गुंजन सक्सेना यांच्या कोर्समेट होत्या. एअरफोर्स अकॅडमी आणि हॅलिकॉप्टर ट्रेनिंग स्कूलमध्ये गुंजन यांच्यासोबत त्यांनीसुद्धा प्रशिक्षण घेतले होते.
फेसबुकबवर एक लांबलचक पोस्ट लिहून श्रीविद्या यांनी अनेक दावे केले आहेत.  


काय लिहिले पोस्टमध्ये,

गुंजन व मी आम्हा दोघींचीही पोस्टिंग 1996 मध्ये उधमपूर येथे झाली होती. मात्र गुजंन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये युनिटमध्ये केवळ गुंजन हीच एकमेव महिला पायलट असल्याचे दाखवण्यात आलेय. हेलिकॉप्टर युनिटमध्ये पोस्टींग मिळालेल्या आम्ही दोघी महिला पायलट होतो, त्यामुळे या पुरूषप्रधान क्षेत्रात आम्हाला कसे स्वीकारले जाईल, याबद्दल आमच्या मनात शंका होती. अपेक्षेनुसार, काही सहकाºयांकडून आम्हाला तशी वागणूकही मिळाली. पण सोबत आम्हाला मदत करणारेही अनेक सहकारी होते. अत्यंत कठोर निकषांवर आम्हाला पडताळले गेले. आमच्या काही चुका ज्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकले असते, त्या सुधारण्यासाठीही आमच्यावर कारवाई केली गेली. आम्हाला आमच्या पुरूष सहकाºयांच्या तुलनेत अधिक कष्ट घ्यावे लागले, जेणेकरून आम्ही स्वत: सिद्ध करू शकू. काही लोक असे होते, जे आमच्यासोबत प्रोफेशनल स्पेस शेअर करताना आनंदी नव्हते.

 संस्थेत दाखल होताच काही दिवसांत आमचे प्रशिक्षण सुरू झाले होते.  गुंजन सक्सेना यांचे प्रशिक्षण अनेकदा रद्द केले गेले, असे सिनेमात दाखवले गेलेय. पण तसे काहीही घडले नव्हते. इतकेच नाही तर कारगिल ऑपरेशनमध्ये गुंजन सक्सेना या एकमेव महिला पायलट नव्हत्या. उधमपूरमध्ये आम्हा दोघींची पोस्टिंग झाली होती आणि जेव्हा कारगिल युद्ध सुरू झाले तेव्हा त्यात कर्तव्य बजावणारी मी सुद्धा एक महिला पायलट होती, असे श्रीविद्या यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. 
‘गुंजन सक्सेना’ या बायोपिकवर भारतीय वायूसेनेनेही आक्षेप घेतला आहे. त्यासंदर्भातील पत्र वायूसेनेने सेन्सॉर बोर्डाला तसेच धर्मा प्रॉडक्शन आणि नेटफ्लिक्सला पाठवले आहे. या चित्रपटामध्ये भारतीय वायूसेनेची चुकीची प्रतिमा साकारण्यात आल्याचा आरोप वायूसेनेने या पत्रात केला आहे.

Web Title: gunjan saxena coursemate sreevidya rajan slams biopic syas factually incorrect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.