गुरमीत चौधरीची होणार टेलिव्हिजन ‘वापसी’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2017 07:48 AM2017-04-17T07:48:47+5:302017-04-17T13:18:47+5:30
टेलिव्हिजन ते बिग स्क्रीन असा प्रवास करणारा गुरमीत चौधरी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर वापसी करणार आहे. आश्चर्य वाटले ना? पण ...
ट लिव्हिजन ते बिग स्क्रीन असा प्रवास करणारा गुरमीत चौधरी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर वापसी करणार आहे. आश्चर्य वाटले ना? पण बातमीत दम आहे. तूर्तास गुरमीत यावर बोलला नसला तरी सूत्रांकडून तशी खात्रीदायक माहिती मिळाली आहे. गुरमीत टेलिव्हिजनवर परतणार आहे, हे खरे असले तरी तो इंडियन टीव्हीवर नाही तर इंडोनेशियन टीव्हीवर वापसी करणार आहे. होय, गुरमीत एका इंडोनेशियन टीव्ही सीरिजमध्ये दिसणार आहे. सध्या इंडोनेशियन टेलिव्हिजन शोमध्ये छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार अभिनय करताना दिसत आहेत. मृणाल जैन, शाहीर शेख असे छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार इंडोनेशियन टीव्ही शोमध्ये काम करत आहेत. अशाच एका शोमध्ये गुरमीतला एक महत्त्वपूर्ण रोल आॅफर झाला आहे. गुरमीतने या रोलसाठी होकार दिल्याचे कळतेय. खरे तर गुरमीतला ही भूमिका कशी मिळाली, यामागचे अतिशय रोचक कथा आहे. गुरमीत व दृष्टि धामी या दोघांच्या ‘गीत हुई सबसे पराई’ या शोचे इंडोनेशियातही प्रसारण केले गेले होते. या शोला इंडोनेशियात प्रचंड लोकप्रीयता मिळाली होती. याच शोमुळे गुरमीतकडे ही भूमिका चालून आली. गुरमीतचा अभिनय, त्याची लोकप्रीयता बघून इंडोनेशियन मेकर्सने आपल्या शोसाठी त्याची निवड केली. तूर्तास या शोचा कन्सेप्ट काय असेल, हे स्पष्ट झालेले नाही. एकंदर काय, तर या शोमुळे गुरमीतच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे.
‘लाली के शादी में लड्डू दीवाना’ हा गुरमीतचा सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला. अर्थात बॉक्सआॅफिसवर तो दणकून आपटला. यापूर्वी गुरमीत ‘वजह तुम हो’मध्ये दिसला होता. पण हा चित्रपटही बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता.
‘लाली के शादी में लड्डू दीवाना’ हा गुरमीतचा सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला. अर्थात बॉक्सआॅफिसवर तो दणकून आपटला. यापूर्वी गुरमीत ‘वजह तुम हो’मध्ये दिसला होता. पण हा चित्रपटही बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता.