भावा जिंकलंस! अभिनेता गुरमीत चौधरी दोन ठिकाणी १ हजार खाटांचं हॉस्पिटल उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 01:52 PM2021-04-26T13:52:20+5:302021-04-26T13:52:51+5:30
Gurmeet Choudhary : कोरोना काळात मदतीचा हात...! सोनू सूदनंतर गुरमीत चौधरीने कसली कंबर
देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. रूग्णालयातील बेड, ऑक्सिजन शिवाय औषधांसाठी लोकांचा आक्रोश सुरू आहे. अशात मदतीचे अनेक हातही पुढे येत आहेत. अलीकडे अभिनेता सोनू सूदने टेलिग्राम अॅपवर ‘इंडिया फाइट्स विद कोव्हिड’ ही नवी मोहिम सुरू केली आहे. आता अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) याने 1 हजार खाटांचे रूग्णालय उभारण्यासाठी कंबर कसली आहे. (Gurmeet Choudhary to open Covid 19 hospitals)
गुरमीत लखनौ आणि पाटण्यात कोरोना रूग्णांसाठी रूग्णालय उघडणार आहे. ट्विटर अकाऊंटवर गुरमीतने याबद्दलची घोषणा केली.
‘पाटणा आणि लखनौत अल्ट्रा मॉडर्न सुविधांना सज्ज रूग्णालय उभारण्याचा निर्णय मी घेतला आहे. रूग्णालय एक-एक हजार खाटांचे असेल. अन्य शहरांमध्येही अशीच रूग्णालये उभारणार. फक्त तुमचा आशीर्वाद आणि सहकार्य असू द्या. जयहिंद. लवकरच डिटेल्स शेअर करेन,’ असे गुरमीतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
तूर्तास गुरमीतच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अभिनेता करण वाही याने गुरमीतला मदतीचा हात देऊ केला आहे.
महामारीच्या या काळात गुरमीतने सोशल मीडियाच्या मदतीने लोकांना बेड आणि ऑक्सिजन, प्लाज्मा मिळवून देण्यासाठी मदत करतोय. गेल्या वर्षी गुरमीत आणि त्याची पत्नी देबीना बॅनर्जी या दोघांना कोरोना झाला होता.
200 मजुरांना भोजन
अभिनेता शोएब इब्राहिम हा सुद्धा कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. स्थलांतरित मजुरांना तो रोज एका वेळचे भोजन पुरवतो आहे. शिवाय मास्कचे वाटपही त्याने सुरू केले आहे. महिनाभर 200 मजुरांना एकावेळचे भोजन देणार असल्याची माहिती अलीकडेच त्याने व्हिडीओ शेअर करत दिली होती.