हल्ल्यानंतर गुरु रंधावा भारतात परतला घेतला 'हा' मोठा निर्णय, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 04:26 PM2019-07-31T16:26:19+5:302019-07-31T16:28:00+5:30
प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा याच्यावर गत मंगळवारी कॅनडामध्ये हल्ला करण्यात आला होता. कॅनडामध्ये तो कॉन्सर्ट टूरसाठी गेला होता.
प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा याच्यावर गत मंगळवारी कॅनडामध्ये हल्ला करण्यात आला होता. कॅनडामध्ये तो कॉन्सर्ट टूरसाठी गेला होता. ज्यावेळी परफॉर्मन्स संपवून तो स्टेजवरुन खाली येत होतो त्यादरम्यान एक अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. ज्यात त्याच्या उजव्या भुवयांजवळ मार लागला असून चार टाके पडले. गुरू रंधावा सध्या भारतात परतला आहे आणि त्याने यानंतर कॅनडामध्ये परफॉर्म न करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरू रंधावाच्या ट्विटरवरुन फोटो पोस्ट करुन या घटनेबाबतचे एक निवेदन जाहीर केले आहे. ज्यात या संपूर्ण प्रकाराबाबतची माहिती दिली आहे की, मेगा सक्सेसफुल कनाडा टूरनंतर गुरु भारतात परतला आहे. त्याच्या उजव्या भुवयीवर आयब्रोच्या वर 4 टाके पडले आहेत. 28 जुलैला वैंकूवर इथे हा प्रकार घडला.
ज्यावेळी गुरु रंधावा परफॉर्म करत होता त्या दरम्यान त्याने एका पंजाबी व्यक्तीला स्टेजवर येण्यास नकार दिला. तो सारखा स्टेजवर येण्याचा प्रयत्न करत होता ऐवढेच नाही त्याने बॅकस्टेज काम करण्यांशी भांडण करणं सुरु केले. ज्यावेळी गुरु रंधावा परफॉर्मन्स संपवून स्टेजवरुन खाली उतरता होता त्यावेळी त्यांने गुरुवर हल्ला केला.
सध्या गुरु भारतात सुरक्षित आहे. टाईम्सच्या रिपोर्टनुसार गुरु रंधावाने पूर्ण आयुष्यात पुन्हा कधीच कॅनडामध्ये परफॉर्म न करण्याचा निर्णय घेतला आहे.