Gyanpith Award : प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 05:15 PM2024-02-17T17:15:17+5:302024-02-17T17:15:51+5:30

Gulzar selected for Gyanpith Award: याआधी गुलजार यांना साहित्य अकादमी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण आणि कमीत कमी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.

Gyanpith Award: Gyanpith Award announced to famous Urdu poet Gulzar | Gyanpith Award : प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

Gyanpith Award : प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकार गुलजार (Gulzar) आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्काराने (Gyanpith Award) सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी गुलजार आणि संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या नावाची निवड करण्यात आल्याचे ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी जाहीर केले.

गुलजार यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी ओळखले जाते आणि ते उर्दूतील उत्कृष्ट कवींपैकी एक मानले जातात. यापूर्वी, गुलजार यांना उर्दू साहित्य आणि हिंदी चित्रपटांमधील योगदानासाठी २००२ मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, २००४ साली पद्मभूषण आणि कमीत कमी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आले आहेत.

दोन भाषांमधील नामवंत लेखकांना पुरस्कार जाहीर
त्याच वेळी, चित्रकूटमधील तुलसी पीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेते, शिक्षक आणि १०० हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत. ज्ञानपीठ निवड समितीने सांगितले की, "हा पुरस्कार (२०२३ साठी) दोन भाषांमधील नामवंत लेखकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे: संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार."

Web Title: Gyanpith Award: Gyanpith Award announced to famous Urdu poet Gulzar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :gulzarगुलजार