Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगाच्या दाव्यावर कंगनानं दिली अशी प्रतिक्रिया, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:32 AM2022-05-19T11:32:01+5:302022-05-19T13:16:38+5:30
Kangana Ranaut Reaction On Gyanvapi Masjid Dispute : कंगणा आपल्या बेधडक अंदाजासाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे.
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरू असतानाच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणैत वाराणसीत पोहोचली आहे. ती सध्या आपला आगामी चित्रपट 'धाकड'चे प्रमोशन करत आहे. याच पार्श्वभूमीर ती आपल्या 'धाकड' टीम आणि कलाकारांसह काशी विश्वनाथाच्या मंदिरात पोहोचली. येथे तिने काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले आणि पूजा-अर्चना केली.
यावेळी माध्य प्रतिनिधींनी कंगनाला ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळल्याच्या दाव्यासंदर्भात प्रश्न केला असता, 'काशीच्या कणा-कणात महादेव आहेत,' असे उत्तर कंगणाने दिले. कंगणा आपल्या बेधडक अंदाजासाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे.
माध्यम प्रतिनिधीला उत्तर देताना कंगना म्हणाली, 'जसे मथुरेच्या कणा-कणात भगवान कृष्ण आहेत, जसे अयोध्येच्या कणा-कणात राम आहेत, तसेच काशीच्या कणा-कणात महादेव आहेत. त्यांना कसल्याही प्रकारच्या संरचनेची आवश्यकता नाही.' यानंतर कंगनाने हरहर महादेवच्या घोषणा दिल्या. कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
"There's Lord Krishna in every particle of Mathura & Lord Ram in every particle of Ayodhya. Similarly, there's Lord Shiva in every particle of Kashi. He doesn't need a structure, he resides in every particle," Kangana Ranaut when asked about Shivling claim site at Gyanvapi mosque pic.twitter.com/xFzdaT9lAb
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 19, 2022
कंगना राणौत सध्या विविध ठिकाणी जाऊन तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. आता कंगना वाराणसीला पोहोचली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटोही शेअर केले आहेत. यात ती काशी विश्वनाथ मंदिरात आरती करताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत तिचे सहकलाकार अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्तादेखील उपस्थित होते.
या चित्रपटात कंगनाने जबरदस्त अॅक्शन सीन्स दिले आहेत. यामुळेही कंगना चर्चेत आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच 20 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होथ आहे.