​हेअर ट्रान्सप्लांट करून पस्तावतोय ‘हा’ पाकिस्तानी अभिनेता! व्हिडिओ पाहा, तेव्हाच कळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 09:25 AM2018-02-04T09:25:21+5:302018-02-04T15:11:38+5:30

अनेक भारतीय व पाकिस्तानी चित्रपटांत अभिनय करणारा पाकिस्तानी अभिनेता साजिद हसन याला मेकओवर महागात पडला. होय, या मेकओवरने त्याला ...

'Ha' Pakistani actor turning into a hair transplant! Watch the video, only know! | ​हेअर ट्रान्सप्लांट करून पस्तावतोय ‘हा’ पाकिस्तानी अभिनेता! व्हिडिओ पाहा, तेव्हाच कळेल!

​हेअर ट्रान्सप्लांट करून पस्तावतोय ‘हा’ पाकिस्तानी अभिनेता! व्हिडिओ पाहा, तेव्हाच कळेल!

googlenewsNext
अनेक भारतीय व पाकिस्तानी चित्रपटांत अभिनय करणारा पाकिस्तानी अभिनेता साजिद हसन याला मेकओवर महागात पडला. होय, या मेकओवरने त्याला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय. एका मित्राच्या सल्लयावरून हेअर ट्रान्सप्लांट ट्रिटमेंट घेणे त्याला चांगलेच भोवले. या ट्रान्सप्लांटने साजिदच्या डोक्यावर केस तर उगवले नाहीत उलट डोक्यावर मोठी जखम मात्र झाली. 

 


 

 
























ओमर आर कुरेशीच्या टिष्ट्वटर हँडलवरून साजिदचा एक व्हिडिओ शेअर केला गेलाय.  ४३ सेकंदांच्या या व्हिडिओत साजिद आपली आपबीती सांगतोय. या व्हिडिओत त्याच्या डोक्यावरची जखम स्पष्ट दिसतेय. ही जखम बरीच खोल आणि गंभीर स्वरूपाची दिसतेय. चुकीचा उपचार आणि डॉक्टरचा निष्काळजीपणा यामुळे माझ्यावर ही वेळ ओढवली. याबद्दल मी कधी विचारही करू शकत नाही. यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या जखमेमुळे काम करणे आणि ते मिळवणेही कठीण झाले आहे, असे साजिदने यात सांगितले आहे. शिवाय  हेअर ट्रान्सप्लांट करायचे असल्यास तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरकडे जाण्याचा सल्लाही त्याने दिला आहे. 
साजिदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे. आत्तापर्यंत दोन लाखांवर लोकांनी त्याचा हा व्हिडिओ पाहिला आहे.अनेकांनी साजिदसोबत झालेला प्रकार गंभीर असल्याचे सांगत यावर संताप व्यक्त केला आहे.
साजिदने सलाखे, पहला पहला प्यार, ए मायटी हट, अजान, जलेबी, मालिक आणि रहम सारख्या चित्रपटांत काम केलेय. छोट्या पडद्यावरही तो लोकप्रीय आहे. टीव्ही शो अगर पासून धूप किनारे, तानसेन, मसूरी, निजात, हम तुम, डॅडी, तन्हा आणि बेकसूर यासारख्या टीव्ही शोमध्ये साजिदने काम केलेय.











 


Web Title: 'Ha' Pakistani actor turning into a hair transplant! Watch the video, only know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.