हेमामालिनींच्या घरी पुन्हा चोरी, त्या म्हणाल्या, ‘चोर कोण? हे मला माहीत आहे’!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 10:06 AM2017-10-05T10:06:54+5:302017-10-05T15:36:54+5:30

ड्रीमगर्ल म्हणून ओळखल्या जाणाºया अभिनेत्री तथा खासदार हेमामालिनी यांच्या मुंबई स्थित गुदामातून सुमारे एक लाख रुपयांच्या साहित्याची चोरी झाली ...

Hammalini's house again stole, she said, 'Who is the thief? I know that! | हेमामालिनींच्या घरी पुन्हा चोरी, त्या म्हणाल्या, ‘चोर कोण? हे मला माहीत आहे’!

हेमामालिनींच्या घरी पुन्हा चोरी, त्या म्हणाल्या, ‘चोर कोण? हे मला माहीत आहे’!

googlenewsNext
रीमगर्ल म्हणून ओळखल्या जाणाºया अभिनेत्री तथा खासदार हेमामालिनी यांच्या मुंबई स्थित गुदामातून सुमारे एक लाख रुपयांच्या साहित्याची चोरी झाली आहे. एकीकडे पोलीस चोरांचा तपास लावण्यात दंग असताना हेमामालिनी यांनी, मला चोर माहीत असल्याचे सांगत पोलिसांनाच धक्का दिला आहे. स्पॉटबॉय डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार हेमामालिनी अंधेरीत असलेल्या या गुदामाचा वापर कॉस्ट्यूम, रंगमंचाचे साहित्य, बनावट दागिने, डान्स शो किंवा शूटशी संबंधित साहित्य ठेवण्यासाठी करतात. चोरट्यांनी गुदामातून जवळपास ९० हजारांपेक्षा साहित्य लंपास केले आहे. जेव्हा गुदामाच्या व्यवस्थापकाला साहित्य चोरी झाल्याची भणक लागली तेव्हा त्यांनी याबाबतची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दाखल केली. 

पोलिसांना संशय आहे की, ही चोरी त्यांच्याच ओळखीच्या किंवा गुदामाशी संबंधित व्यक्तीने केली असावी. वास्तविक हेमामालिनी गेल्या पाच दिवसांपासून घरातील नोकरांच्या मदतीने या गुदामाची साफसफाई करीत होत्या. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी गडद झाला आहे. सध्या पोलीस या सर्व नोकरांचा कसून तपास करीत आहे. मात्र यातील एक नोकर गायब झाला असून, त्याने त्याचा फोन बंद केला असल्याने त्यानेच ही चोरी केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. 

शिवाय हेमा यांनीदेखील या नोकरावर संशय व्यक्त केल्याने, पोलिसांचा तपास त्यादृष्टीने सुरू आहे. २०१० सालीदेखील हेमा यांच्या गोरेगाव येथील निवासातून ८० लाख रोख आणि काही दागिने चोरीला गेले होते. सध्या हेमा त्यांची मोठी मुलगी इशा देओल हिच्या प्रेग्नेंसीकाळात तिला सर्व मदत करण्यात व्यस्त आहेत. अशात ही चोरी झाल्याने, त्यांनी पोलिसांना तातडीने या प्रकरणातील चोरांना अटक केली जावी, असे सांगितले आहे. 

Web Title: Hammalini's house again stole, she said, 'Who is the thief? I know that!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.