हंसल मेहता म्हणाले, चित्रपट फ्लॉप तर दिग्दर्शक दोषी अन् हिट झाला तर सगळे श्रेय हिरोचे!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 12:54 PM2018-11-01T12:54:10+5:302018-11-01T12:55:44+5:30
बॉक्सआॅफिसवरच्या हिट-फ्लॉप या फॉर्म्युल्यावर हंसल मेहताने नेमके बोट ठेवले आहे.
दिग्दर्शक हंसल मेहता ‘अलिगढ’,‘शाहिद’,‘सिटीलाईट्स’ अशा चित्रपटांसाठी ओळखले जातात. आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये हंसल मेहता यांनी बऱ्याच पुरस्कारांवर नाव कोरले आहे. पण आता बॉक्सआॅफिसवरच्या हिट-फ्लॉप या फॉर्म्युल्यावर हंसल मेहताने नेमके बोट ठेवले आहे. होय, अलीकडे एका मुलाखतीत हंसल मेहता बोलत होते. जेव्हा एखादा चित्रपट अपयशी ठरतो, तेव्हा त्या अपयशाचे सगळे खापर दिग्दर्शकाच्या डोक्यावर फोडले जाते. याऊलट चित्रपट हिट होताच, लीड हिरो-हिरोईन यशाचे सगळे श्रेय घेऊन मोकळे होतात, असे हंसल मेहता म्हणाले. मला आवडो न आवडो पण अपयश हे दिग्दर्शकाच्या झोळीत पडते आणि यश कलाकारांना मिळते. माझ्या २२ वर्षांच्या करिअरमधील अनुभव तरी हाच आहे, असे हंसल मेहता म्हणाले.
अलीकडे मीटू मोहिमेवर हंसल मेहता यांनी परखड मत मांडले होते. या मोहिमेअंतर्गत गैरवर्तनाचे आरोप झेलणारे दिग्दर्शक विकास बहल याच्यावर हंसल यांनी आक्रमक शब्दांत टीका केली होती. या टीकेनंतर हंसल यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले होते. ‘या हिन माणसाविरूद्ध कुणी काही करणार?’, असा सवाल त्यांनी केला होता. पण याचा परिणाम म्हणजे, हंसल मेहता यांना यानंतर अतिशय वार्ईट पद्धतीने ट्रोल केले गेले होते. या ट्रोलिंगमुळे हंसल मेहता इतके वैतागले होते की, त्यांनी ट्विटरलाच रामराम ठोकला होता. ट्विटर सोडताना ,‘मी एका गोष्टीवर माझे मत मांडले आणि त्यामुळे मला ट्रोल व्हावे लागले. या प्लॅटफॉर्मवर लोक नकारात्मकता पसरवत आहेत. मी माझे विचार मांडणे थांबवणार नाही़ ते मी यानंतरही मांडणार, पण इथे नाही,’असे हंसल मेहता यांनी लिहिले होत.