दिग्दर्शक म्हणाले कंगनासोबत काम करण्याचा अनुभव वेदनादायी, सेटवर तिनेच घेतला होता सर्व कंट्रोल...
By अमित इंगोले | Published: October 26, 2020 01:17 PM2020-10-26T13:17:03+5:302020-10-26T13:24:16+5:30
हफिंग्टन पोस्ट इंडियासोबत बोलताना आपला अनुभव शेअर करताना मेहता म्हणाले की, 'हा सिनेमा पूर्णपणे माझ्या कंट्रोलमधून बाहेर गेला होता.
कंगना रणौतला घेऊन 2017 मध्ये 'सिमरन' सिनेमा करणारे दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यानुसार कंगनासोबत काम करण्याचा अनुभव फारच वेदनादायी होता. त्यांच्यानुसार हा अनुभव इतका वाईट होता की, त्यांना त्याबाबत विचारही करायचा नाहीये. ते एका मुलाखतीत म्हणाले की, कधी कधी त्यांना वाटतं की, तो सिनेमा त्यांनी करायला नको होता.
सेटवर असं वागू लागली होती कंगना
हफिंग्टन पोस्ट इंडियासोबत बोलताना आपला अनुभव शेअर करताना मेहता म्हणाले की, 'हा सिनेमा पूर्णपणे माझ्या कंट्रोलमधून बाहेर गेला होता. परिस्थिती सुखद नव्हती. ती सेटवर पूर्णपणे चार्ज घेऊन दुसऱ्या कलाकारांना डायरेक्ट करू लागली होती. माझे खूपसारे पैसेही गेले, ज्याच्याशी तिचं काही देणं-घेणं नव्हतं'. (महाराष्ट्र तुमच्या मालकीचा असल्यासारखे का वागताय?; कंगनाचा मुख्यमंत्र्यांना सवाल)
मेहता पुढे म्हणाले की, 'आर्थिक रूपाने हा सिनेमा मला खूप भारी पडला. या सिनेमाच्या सेटवर जे झालं त्याचा प्रभाव त्यांच्या मानसिक स्थितीवर पडला होता. 'सिमरन' बाबत मला पश्चाताप आहे. पण कटुता नाही'.
बरेच वर्ष कंगनासोबत बोलणं झालं नाही
हंसल मेहता म्हणाले की, त्यांच्य मनात कंगनाबाबत काही कटुता नाही. पण बऱ्याच वर्षापासून तिच्यासोबत बोलणं झालं नाही. ते म्हणाले की, 'ट्विटरवर आमच्या चांगलं आदान-प्रदान होतं. तिने मला एकदा चहाला बोलवलं होतं. जेणेकरून सगळं ठीक होईल. बातचीत करण्याचं काही कारण नाही. तिच्यासोबतची भेट सौहार्दपूर्ण होते. माझ्या मनात तिच्याविषयी काही वाईट नाही'. (ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचा संजय राऊतांवर निशाणा; म्हणाली...)
कंगनाला चांगली अभिनेत्री मानतात हंसल
हंसल मेहता यांच्यानुसार, इतर गोष्टी सोडल्या तर कंगना एक फार चांगली अभिनेत्री आहे. ते म्हणाले की, 'ती एक फार चांगली अभिनेत्री आहे. कुणाला काय माहीत उद्या असंही होईल की, आम्ही एखाद्या सिनेमात सोबत काम करू. माझ्या मनात तिच्यासाठी काही कटुता नाही'.