लग्नानंतर पती सोहेलसोबत युरोपमध्ये हनीमून एन्जॉय करतेय हंसिका, बुडापेस्टच्या रस्त्यावर दिसली स्कूटर चालवताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 19:29 IST2022-12-27T18:07:54+5:302022-12-27T19:29:26+5:30
हंसिका पती सोहेलसोबत युरोपमध्ये हनिमून एन्जॉय करते आहे. स्कूटर चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लग्नानंतर पती सोहेलसोबत युरोपमध्ये हनीमून एन्जॉय करतेय हंसिका, बुडापेस्टच्या रस्त्यावर दिसली स्कूटर चालवताना
Hansika Motwani Honeymoon: साऊथ चित्रपटांची अभिनेत्री हंसिका मोटवानी(Hansika Motwani)ने काही दिवसांपासून बॉयफ्रेंड सोहेल कथुरिया(Sohael Kathuriya) शी लग्नगाठ बांधली. सध्या ती पती सोहेलसोबत युरोपमध्ये हनिमून एन्जॉय करते आहे. हंसिका मोटवानीचा या हनीमून ट्रिपचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती खूप आनंदी दिसत आहे.
हंसिका मोटवानीने इन्स्टा स्टोरीवर बुडापेस्टमधील स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ई-सायकल चालवताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ई-स्कूटर चालवताना दिसली हंसिका मोटवानी
व्हिडिओमध्ये हंसिका मोटवानीने ब्राउन रंगाचा ओव्हरकोट घातलेला दिसत आहे. तिने ब्लू डेनिम, काळे बूट घातले आहेत आणि ती ई-स्कूटर चालवताना दिसत आहे. बॅकग्राऊंडमध्ये अभिषेक बच्चनच्या धूम या चित्रपटाचा टायटल ट्रॅक ऐकू येत आहे. स्कूटर चालवताना कॅमेऱ्याकडे बघत ती हसतेय.
याआधी हंसिका मोटवानीने विएनामधील ख्रिसमस सेलिब्रेशनदरम्यान काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते, ज्यामध्ये ती सांताक्लॉजसोबत पोझ देताना दिसली होती. अभिनेत्रीने सुंदर ख्रिसमस-ट्रीची झलक दाखवली. याशिवाय अनेक फोटोंमध्ये हंसिका पती सोहेलसोबत दिसली होती.