बर्थ डे बॉय हृतिक रोशनला एक्स-वाईफ सुजैन खानने दिल्या अशा शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 04:44 AM2018-01-10T04:44:12+5:302018-01-10T10:14:12+5:30
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करतोय. निळे डोळे आणि डान्स स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या ...
ब लिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करतोय. निळे डोळे आणि डान्स स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या हृतिकचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी मुंबईत झाला होता. २००० मध्ये ‘कहो ना प्यार है’ या सुपरहिट चित्रपटाने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात करणा-या हृतिकने याच वर्षात त्याची गर्लफ्रेन्ड सुजैन खानसोबत लग्न केले होते. पण १४ वर्षानंतर हृतिक व सुजैन कायदेशीररित्या विभक्त झालेत. अर्थात घटस्फोटानंतरही दोघांचे बॉन्डिंग अतिशय चांगले आहे. सुजैनच्या ताज्या इन्स्टाग्राम पोस्टवरून तरी हेच सिद्ध होते. होय, हृतिकच्या वाढदिवशी सुजैनने त्याच्यासोबतची एक सेल्फी पोस्ट केली आहे. यात दोघांचीही केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. ‘तू कायम...कायम माझ्या आयुष्यातील प्रकाश बनून राहशील. वाढदिवसाच्या शुभेच्छा...’, असे सुजैनने एक्स हसबण्ड हृतिकसाठी लिहिले आहे.
ALSO READ : B'day Special : लहानपणी हकलत बोलायचा हृतिक रोशन; लग्नासाठी आले होते ३० हजार प्रस्ताव!
सुजैनच्या या पोस्टला ८ तासांत ५८ हजारांवर लाईक्स मिळाले आहेत. शेकडो लोकांनी हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हृतिक रोशन व सुजैन खान या दोघांचा २०१४ मध्ये घटस्फोट झालाय. पण घटस्फोटानंतरही दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. हृतिकच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात सुजैन आवर्जून हजेरी लावली. दोघेही मुलांसोबत हॉली डे एन्जॉय करतात. खरे तर हृतिक व सुजैन यांच्या घटस्फोटानंतर अनेक चर्चा रंगल्या. या घटस्फोटामागचे कारण काय, यानिमित्ताने नाही नाही ते बोलले गेले. पण याऊपरही अटीतटीच्या वेळी एक्स वाईफ सुजैन हृतिकच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहत आलीय. अलीकडे हृतिक व कंगना राणौत या दोघांच्या वादातही सुजैने हृतिकला खंबीर पाठींबा देताना दिसली होती.चर्चा खरी मानाल तर, सुजैन हिनेच हृतिकला आपली बाजू मांडण्याचा सल्ला दिला होता. कंगनाचे सगळे आरोप खोटे आहेत, यावर सुजैनचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे तिनेच आपल्या एक्स-हसबण्डला याप्रकरणी लोकांसमोर येण्यासाठी राजी केले होते. मी तुझ्या पाठीशी आहे. सगळ्या आरोपांना खंबीरपणे सामोरे जा, असे सुजैनने हृतिकला सांगितले होते.