अन् रेप सीन देताना या खलनायकाचा सुटला होता स्वत:वरचा ताबा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 10:26 AM2019-10-30T10:26:57+5:302019-10-30T10:35:35+5:30

चित्रपटांमध्ये इंटिमेट वा रेप सीन शूट करणे अतिशय कठीण काम असते. इंटिमेट वा रेप सीन देताना अनेकदा अभिनेत्यांचा स्वत:वरचा ताबा सुटतो आणि अभिनेत्रींना लाजीरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागते.

happy birthday dalip tahil controversy with jaya prada | अन् रेप सीन देताना या खलनायकाचा सुटला होता स्वत:वरचा ताबा! 

अन् रेप सीन देताना या खलनायकाचा सुटला होता स्वत:वरचा ताबा! 

googlenewsNext
ठळक मुद्देहोय, डायरेक्टरने अ‍ॅक्शन म्हणतात, हा सीन सुरु झाला. पण या सीनवेळी दलीप स्वत:वरचा ताबा गमावून बसले.

चित्रपटांमध्ये इंटिमेट वा रेप सीन शूट करणे अतिशय कठीण काम असते. इंटिमेट वा रेप सीन देताना अनेकदा अभिनेत्यांचा स्वत:वरचा ताबा सुटतो आणि अभिनेत्रींना लाजीरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. बॉलिवूडचे खलनायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते दलीप ताहिल यांच्याबद्दल असेच काही घडले होते. आज दलीप ताहिल यांचा वाढदिवस. त्यानिमित्त जाणून घेऊ या हा एक पडद्यामागचा किस्सा...

  एका सिनेमात दलीप ताहिल आणि अभिनेत्री जया प्रदा यांच्यावर एक रेप सीन शूट केला जाणार होता. प्रत्यक्षात या सीनच्या शूटींगला सुरुवात झाली. पण यावेळी असे काही घडले की, जयाप्रदा यांना लाजीरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. होय, डायरेक्टरने अ‍ॅक्शन म्हणतात, हा सीन सुरु झाला. पण या सीनवेळी दलीप स्वत:वरचा ताबा गमावून बसले. त्यांनी जयाप्रदा यांना करकचून पकडले.

जयाप्रदा यांनी आधी स्वत:ला दलीप यांच्या तावडीतून सोडवण्याचे प्रयत्न केलेत. पण त्यांना त्रास व्हायला लागला तेव्हा  त्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता दलीप यांच्या कानशिलात लगावली. हे पाहून सेटवरचा प्रत्येकजण स्तब्ध झाला होता. यानंतर बराच वेळ शूटींग ठप्प पडली. अर्थात काही तासांनंतर हा सीन पुन्हा शूट करण्यात आला होता.

हा सीन नेमका कुठल्या चित्रपटासाठी शूट करण्यात आला होता, याची माहिती उपलब्ध नाहीये. दलीप आणि जया यांनी ‘आखिरी रास्ता’ या चित्रपटात एकत्र शेवटचे काम केले होते. हा चित्रपट 1986 साली रिलीज झाला होता.

Web Title: happy birthday dalip tahil controversy with jaya prada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.