Govinda Birthday : या अभिनेत्रीच्या प्रेमाखातर गोविंदाने मोडले होते ठरलेले लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 08:00 AM2019-12-21T08:00:00+5:302019-12-21T08:00:02+5:30

Govinda Birthday : आज गोविंदाचा वाढदिवस...

happy birthday govinda, love story with neelam | Govinda Birthday : या अभिनेत्रीच्या प्रेमाखातर गोविंदाने मोडले होते ठरलेले लग्न!!

Govinda Birthday : या अभिनेत्रीच्या प्रेमाखातर गोविंदाने मोडले होते ठरलेले लग्न!!

googlenewsNext
ठळक मुद्देआईच्या इच्छेखातर  गोविंदाने सुनीतासोबत लग्न केले.

गोविंदाचा डान्स अन् त्याचे डायलॉग म्हणजे अफलातून. या दोन गोष्टींनी गोविंदा लोकप्रिय झाला. तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनला. आजही गोविंदाचे चाहते त्याला विसरलेले नाहीत, ते म्हणूनच. एकेकाळी  गोविंदाच्या चित्रपटांची प्रचंड चर्चा होती. पण  चित्रपटांमुळेच नाही तर पर्सनल लाईफमुळेही तो सतत चर्चेत असे. होय, अनेक अभिनेत्रींसोबत गोविंदाचे नाव जोडले गेले. यातल्या एका प्रेमप्रकरणाची प्रचंड चर्चा झाली. ती म्हणजे, गोविंदा व नीलमच्या प्रेमप्रकरणाची.

गोविंदा व नीलमने 10 चित्रपट एकत्र केलेत. यापैकी 6 सिनेमे सुपरहिट झालेत. यादरम्यान गोविंदा नीलमसाठी अक्षरश: वेडा झाला होता. खरे तर पहिल्याच भेटीत तो तिच्यावर भाळला होता. पुढे तो तिच्यात गुंतत गेला अगदी सुनीताशी लग्न ठरले असतानाही.

होय,११ मार्च १९८७ ला  गोविंदाचे लग्न सुनीतासोबत झाले. सुनीता आणि गोविंदा यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. पण लग्न व्हायच्या काही वर्षं आधी गोविंदा नीलमच्या प्रेमात पडला होता. एकीकडे सुनीता आणि दुसरीकडे नीलम अशी त्याची अवस्था झाली होती.  त्या काळात नीलमशिवाय गोविंदाच्या मनात दुसरा कुठलाही विचार नव्हता अगदी होणा-या पत्नीसमोर म्हणजेच सुनीतासमोर तो नीलमची प्रशंसा करताना थकत नसे. एवढेच नाही तर तू सुद्धा नीलमसारखी बन, असेही तो सुनीताला म्हणायला. सुनीता यावर प्रचंड चिडायची.

एकदा असेच झाले. पण यावेळी रागाच्या भरात सुनीता नीलमबद्दल असे काही बोलली की, गोविंदा संतापला. कारण गोविंदा नीलमबद्दल एक शब्दही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. झाले, यावरून त्याचे व सुनीताचे कडाक्याचे भांडण झाले. इतके की, गोविंदाने सुनीतासोबतचा साखरपुडाही मोडला. पण एवढे करूनही नीलम गोविंदाची होऊ शकली नाही.

गोविंदाच्या वडिलांना नीलम आवडत होती. त्यांचा या लग्नाला विरोध नव्हता. पण गोविंदाच्या आईचा या लग्नाला कडाडून विरोध होता. कारण  गोविंदासाठी सुनीताला पसंत केले होते. आईपुढे गोविंदाचे काहीही चालले नाही. अखेर आईच्या इच्छेखातर  गोविंदाने सुनीतासोबत लग्न केले. यानंतर 2011 मध्ये नीलमने समीर सोनीसोबत लग्नगाठ बांधली.

Web Title: happy birthday govinda, love story with neelam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.